एके काळी अॅम्बेसेडर कार अत्यंत प्रसिद्ध होती. अगदी राजकीय मंडळींपासून ते प्रशासनातील लोकांपर्यंत आणि चित्रपट सृष्टीपर्यंतही ही कार वापरली गेली आहे. आजही अनेक लोकांकडे ही कार दिसून येते. हिंदुस्तान मोटर्सने 1957 मध्ये Ambassador Car बाजारात उतरवली होती. ही कार एका ब्रिटिश कारवर बेस्ड होती. या कारने 80 च्या दशकापर्यंत लोकांच्या मनावर राज्य केले आहे. मात्र, मारुती सुझुकी आल्यानंतर, या कारची लोकप्रियता कमी झाली आणि 2014 मध्ये हिचे प्रोडक्शन बंद झाले. मात्र, आजही या कारचे कौतुक केले जाते.
किती होती Ambassador ची किंमत -सध्या सोशल मीडियावर 1972 मधील अॅम्बेसडर कारच्या किंमतीचा फोटो व्हायरल होत आहे. महत्वाचे म्हणजे हा फोटो आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी पोस्ट केला आहे. खरे तर ही 50 वर्षांपूर्वीची अर्थात 25 जानेवारी, 1972 रोजीची एक बातमी आहे. या बातमीचे हिडिंग, "कारची किंमत वाढली," अशी आहे. ही बातमी वाचल्यानंतर समजते, की 1972 मध्ये अॅम्बेसडर कारची किंमत 127 रुपयांनी वाढून 16,946 रुपये झाली होती. ही किंमत वाचून सर्वांनाच अश्चर्याचा धक्का बसला आहे. स्वतः आनंद महिंद्रा यांनीही असेच म्हटले आहे.
Anand Mahindra झाले अवाक -यासंदर्भात आनंद महिंद्रा यांनी, "याने माझ्या 'रविवारच्या आठवणी' ताज्या केल्या. तेव्हा मी जेजे कॉलेजमध्ये होतो. बसने जात होतो. मात्र माझ्या आईने कधी कधी मला आमची निळ्या रंगाची फिएट गाडी चलविण्याची परवानगी दिली होती. पण तेव्हा हिची किंमत एवढी असेल यावर माझा क्वचितच विश्वास बसेल," अशा आशयाचे ट्विट केले आहे.
तरीही लोकांना वाटली महाग - एका युजरने पोस्टमध्ये कमेंट करत म्हटले आहे, "1972 मध्ये माझ्या वडिलांनी ऑन रोड 18000 रुपयांत एक अॅम्बेसेडर कार घेतली होती." आणखी एका युजरने लिहिले, "ही महागडी आहे." आणखी एका युजरने, भारतीय रुपयाच्या घसरणीवर चिंता व्यक्त केली. एकाने लिहिले, "मी बघू शकतो, की वेळेनुसार रुपयाची किंमत कशा प्रकारे कमी होत आहे. आज 15,000 रुपयांत आपल्याला कारचे दोन टायरच मिळतात. मात्र ते 15,000 जर सोन्यात टाकले असते, तर आपल्याला एक कार मिळाली असती.