भारतीय कार बाजारात टाटा मोटर्स आणि महिंद्रा या दोन दिग्गज कंपन्या आहेत. सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटपासून ते मोठ्या एसयूव्ही कार पर्यंत, या दोन्ही कंपन्या अनेक मॉडेल्सची विक्री करत असतात. यातच, महिंद्राची एक एसयूव्ही टाटा मोटर्सवर भारी पडताना दिसत आहे. मिड साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये महिंद्राच्या XUV700 ला जबरदस्त पसंती मिळत आहे. Tata Harrier आणि Tata Safari ला मागे टाकत महिंद्राच्या या कारने विक्रीच्या बाबतीत एक नवा विक्रम केला आहे.
महिंद्राच्या 700 एसयूव्हीने 20 महिन्यांतच तब्बल 1 लाख युनिट्सची डिलिव्हरी नोंदवल्याचे, कंपनीने म्हटले आहे. याच बरोबर, ही महिंद्राची सर्वात लवकर 1 लाख युनिट्सचा टप्पा गाठणारी SUV ठरली आहे. लॉन्चिंगपासूनच या काला जबरदस्त पसंती मिळत आहे. महत्वाचे म्हणजे, या एसयूव्हीने लॉन्चिंगनंतर, 12 महिन्यांतच 50000 युनिट्सच्या विक्रीचा आकडा नोंदवला होता.
किंमत आणि इंजिन -महिंद्रा एक्सयूव्ही 700 ची किंमत 14.01 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 26.18 लाख रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत जाते. ही कार MX आणि AX अशा दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. AX ची विभागणी AX3, AX5 आणि AX7 अशा तीन ट्रिम्समध्ये करण्यात आली आहे.
कंपनीची ही एसयूव्ही 5 आणि 7-सीटर अशा कॉन्फिगरेशन मध्ये येते. या कारसोबत दोन इंजिनचे ऑप्शन देण्यात आले आहेत. पहिले 2-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन (200PS/380Nm) तर दुसरे 2.2-लिटर डिझिले इंजिन (185PS/450Nm). यो दोन्ही इंजिनला 6-स्पीड मॅन्युअल अथवा 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रांसमिशन देण्यात आले आहे.