Most Expensive Car In India: जेव्हा भारतातील सर्वात श्रीमंत लोकांबद्दल बोलले जाते, तेव्हा मुकेश अंबानी, गौतम अदानी, रतन टाटा यांसारखी नावे समोर येतात. या लोकांकडे आलिशान घर, गाड्यांसह सर्व सुखसोई आहेत. तुम्हाला असे वाटत असेल की, त्यांच्यापैकी एखाद्याकडे सर्वात महागडी कार असेल? पण, तुम्ही चुकीचा विचार करताय. आपल्या देशातील सर्वात महागडी कार व्हीएस रेड्डी यांच्याकडे आहे.
कोण आहेत व्हीएस रेड्डी?बंगळुरुमध्ये राहणारे व्हीएस रेड्डी(VS Reddy), हे ब्रिटिश बायोलॉजिकलचे (British Biologicals) एमडी आहेत. त्यांच्याकडे Bentley Mulsanne EWB Centenary Edition आहे. या कारची किंमत सुमारे 14.5 कोटी रुपये आहे. हे मॉडेल ब्रिटीश लक्झरी कार कंपनी बेंटलेने त्यांच्या 100 व्या वर्धापन दिनानिमित्त बनवले होते. या कारचे फक्त 100 युनिट्स बनवले होते. म्हणजेच रेड्डी यांच्याकडे लिमिटेड एडिशन कार आहे.
Bentley Mulsanne EWB Centenary Edition पॉवरट्रेन
Bentley Mulsanne EWB Centenary Edition मध्ये 6.75-liter V8 इंजिन आहे, जे 506 हॉर्सपॉवर आणि 1020 Nm टॉर्क जनरेट करते. यात 8-स्पीड ZF ऑटोमेटेड गिअरबॉक्स आहे. या सेटअपसह ही कार फक्त 5.5 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते. कारचा टॉप स्पीड 296 किमी/तास आहे.
व्हीएस रेड्डी कारचे शौकीन आहेत. त्यांनी इव्हो इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, देशातील प्रत्येक ब्रँडच्या वाहनाचा मालक बनणे, हे त्यांचे बालपणीचे ध्येय होते. त्यांना भारतातील 'प्रोटीन मॅन' म्हणूनही ओळखले जाते. त्याचे न्यूट्रास्युटिकल क्षेत्रातही मोठे काम आहे.