स्कॉर्पिओ एन (Scorpio N) ही महिंद्राची सर्वात आवडती SUV आहे. या कारच्या विक्रीतही मोठी वाढ झाली आहे. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5-स्टार सुरक्षा रेटिंग देखील मिळालंय. पण दुसरीकडे ऑस्ट्रेलियन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (ANCAP) मध्ये SUV सपशेल अपयशी ठरली. ANCAP क्रॅश चाचणी दरम्यान याला शून्य स्टार रेटिंग मिळालंय. आतापर्यंत, या एसयूव्हीमध्ये ॲडव्हान्स्ड इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टम देण्यात आलेलं नाही. त्यामुळे ते फेडरल रजिस्टर ऑफ लेजिस्लेशनच्या ऑस्ट्रेलियन डिझाईन नियम 98/00 (ADR 98/00) अंतर्गत बनवलेल्या सेफ्टी स्टँडर्डची पूर्तता करू शकली नाही. स्कॉर्पिओ एनचे 4WD व्हेरिअंट लवकरच ऑस्ट्रेलियात लाँच होणार आहे.
ऑस्ट्रेलियन न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (ANCAP) ऑस्ट्रेलियामध्ये विकल्या जाणाऱ्या कारची चाचणी करते. ड्राईव्हमधील आर्टिकलनुसार स्कॉर्पिओ एन ला ANCAP च्या सेफ्टी असिस्ट कॅटेगरीमध्ये एकूण झिरो स्कोअर मिळालेत. दुसरीकडे, GNCAP ने क्रॅश चाचणीमध्ये या कारला 5 स्टार सुरक्षा रेटिंग दिले आहे.
ॲडव्हान्स्ड इमर्जन्सी ब्रेकिंगऑस्ट्रेलियात विकण्यात येणाऱ्या महिंद्रा स्कॉर्पिओ एन मध्ये ॲडव्हान्स इमर्जन्सी ब्रेकिंग (AEB) सिस्टम देण्यात येत नाही. याशिवाय यात अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन-कीप असिस्ट आणि ब्लाइंड-स्पॉट मॉनिटरिंग सारखे फीचर्सही मिळत नाहीत. दरम्यान, ऑस्ट्रेलिया कार विक्रीसाठी आवश्यक असलेल्या अन्य गोष्टींची ही कार पूर्तता करते. यात सहा एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेक्स, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC) आणि ड्रायव्हर अलर्ट देण्यात आलं आहे.