Mahindra & Mahindra ने नुकतीच Bolero Neo sub-4 meter SUV इंट्रोड्यूस केली आहे. ही कार भारतीय बाजारात Mahindra TUV 300 ची जागा घेणार आहे. हे मॉडेल आधीपेक्षा चांगला लूक आणि स्टायलिंगसोबत येणार आहे. या कारमध्ये अद्ययावत इंटेरिअर मिळणार आहे.
Anand Mahindra: आनंद महिंद्रांच्या ताफ्यात कोणत्या कंपनीच्या कार? जाणून व्हाल हैरान...
महिंद्राचे ऑटोमोटिव्ह डिव्हिजनचे सीईओ विजय नाकरा (Vijay Nakra) यांनी सांगितले की, कंपनी या कारचे आणखी मोठे व्हर्जन आणण्याची तयारी करत आहे. कंपनी भविष्यात Bolero Neo Plus 9 सीटर व्हर्जन लाँच करणार आहे. बोलेरो भारतीय बाजारावर गारुड करणारी एकेकाळची दमदार एसयुव्ही होती. परंतू, कालांतराने तिचा लूक तसाच राहिल्याने, अपग्रेड न झाल्याने भारतीय ग्राहक स्कॉर्पिओ, टाटा सफारी सारख्या गाड्यांकडे वळले. परंतू आजही बोलेरो गाडीला तोड नाही, असे म्हणणारे बरेच आढळतात.
Mahindra Bolero Neo च्या ताकदीची माहिती घेतली तर, 1493 सीसीचे 3-सिलिंडर वाले इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 3750 आरपीएमवर 100 bhp ची ताकद प्रदान करते. तर 1750-2250 आरपीएमवर 260 Nm पीक टॉर्क तयार करते. याचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचे आहे. Mahindra Bolero Neo एक सब 4 मीटर कार आहे. यामध्ये 2-व्हील ड्राईव्ह सिस्टिम देण्यात आली आहे. तसेच महिंद्राचे मल्टी टेरेन तंत्रज्ञान देण्यात आले आहे. या कारची बॉडी TUV300 च्या तुलनेत खाली आहे. Mahindra Bolero Neo ला भारतीय बाजारात 6 रंगात उपलब्ध केले आहे.
बोलेरो महिंद्राची सर्वाधिक खपाच्या कारपैकी एक कार आहे. 20 वर्षांपासून ही कार भारतीयांच्या पसंतीस उतरलेली आहे. आजवर या कारचे 13 लाख युनिट विकले गेले आहेत. या एसयुव्हीला काळाप्रमाणे अपग्रेडेशनची गरज होती.