भारतातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपल्या सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक विक्री असणाऱ्या स्प्लेंडरच्या किंमती वाढविल्या आहेत. कंपनीने या बाईकच्या सर्व मॉडेल्सच्या किंमतीत वाढ केली आहे. किंमतीशिवाय इतर कोणतेही बदल यात करण्यात आलेले नाहीत. या नवीन किंमती 20 सप्टेंबरपूर्वीच लागू करण्यात आल्या आहेत. तर जाणून घेऊया, कंपनीने कुठल्या मॉडेलची किंमत किती वाढवली. (India's best selling bike Hero splendor has increased the price of all the models know about the price and engine)
मॉडेल्स आणि नवी किंमत -
- स्प्लेंडर आयस्मार्ट ड्रम/अलॉयची किंमत 69,650 रुपये.
- स्प्लेंडर आयस्मार्ट डिस्क/अलॉयची किंमत 72,350 रुपये.
- स्प्लेंडर प्लस किक/ड्रम/अलॉयची किंमत 64,850 रुपये.
- स्प्लेंडर प्लस 100 मिलियन व्हर्जनची किंमत 70,710 रुपये.
- स्प्लेंडर प्लस ब्लॅक अँड एक्सेंट सेल्फ/ड्रम/अलॉयची किंमत 68,860 रुपये.
- सुपर स्प्लेंडर ड्रम/अलॉयची किंमत 73,900 रुपये.
- सुपर स्प्लेंडर डिस्क/अलॉयची किंमत 77,600 रुपये करण्यात आली आहे.
जबरदस्त मायलेज -हिरो स्प्लेंडरची किंमत कमी असून ती अप्रतिम मायलेज देते. असा दावा करण्यात आला आहे, की ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये सुमारे 80.6 किमीचे मायलेज देते. म्हणूनच ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. विक्रीबद्दल बोलायचे झाल्यास ऑगस्ट 2021 मध्ये कंपनीने 2,18,516 युनिट्सची विक्री केली होती, जी गेल्या वर्षी याच महिन्यात 1,77,811 युनिट्स होती. अर्थात या बाईकची विक्री 23 टक्क्यांनी वाढली आहे.
हे मॉडेल्स केले आहेत सादर - याच वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने स्प्लेंडर प्लस आणि पॅशन प्रो मॉडेल्सचे स्पेशल 100 मिलियन व्हर्जन लाँच केले आहे. यात स्प्लेंडर प्लस मॉडेलमध्ये 97.2cc, सिंगल-सिलिंडर इंजिन वापरण्यात आले आहे. जे 7.9bhp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते. दुसरीकडे, हिरो पॅशन प्रो मध्ये 113 सीसी, सिंगल-सिलेंडर आहे, जे 9 bhp पॉवर आणि 9.89Nm टॉर्क जनरेट करते.