शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
4
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
5
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
6
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित ठाकरेंना विधान परिषदेवरून आमदारकीची ऑफर दिली होती- देवेंद्र फडणवीस
7
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
8
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
9
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
10
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
11
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
12
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
13
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
14
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
15
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
16
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
17
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
18
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
19
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
20
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य

Cheapest Electric Car: भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत फक्त 4.70 लाख; मोबाईलनेही केली जाऊ शकते नियंत्रित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 3:00 PM

PMV Eas-E Price And Features : महत्वाचे म्हणजे, ही कार सर्वात स्वस्त असण्याबरोबरच देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार देखील आहे.

देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Cheapest Electric Car) लॉन्च करण्यात आली आहे. मुंबईतील स्टार्टअप पीएमव्ही इलेक्ट्रिकने ही इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. ही एक मायक्रो-इलेक्ट्रिक कार असून हिला ईएएस-ई (EAS-E) असे नाव देण्यात आले आहे. कंपनीने तिची किंमत 4.79 लाख रुपये (एक्स-शोरूम) एवढी ठेवली आहे. मात्र ही किंमत केवळ सुरुवातीच्या 10 हजार ग्राहकांसाठीच असेल. लॉन्चिंगपूर्वीच या कारला 6000 बुकिंग मिळली आहे. ग्राहकांना ही कार कंपनीच्या वेबसाइटवरून बूक करता येऊ शकते. 

आकारानेही सर्वात लहान कार -महत्वाचे म्हणजे, ही कार सर्वात स्वस्त असण्याबरोबरच देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार देखील आहे. PMV Eas-E इलेक्ट्रिक कार पूर्णपणे चार्ज केल्यानंतर 200 किमी पर्यंतची रेंज देते. तिची टॉप स्पीड 70 किमी प्रतितास एवढी आहे. विशेष म्हणजे, ही इलेक्ट्रिक स्मार्ट कार मोबाईल फोनद्वारेही नियंत्रित केली जाऊ शकते.

या कारसोबत IP67 रेटिंग सह 10 Kwh चा लिथिअम आयर्न फॉस्फेट बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक कारला PMSM इलेक्ट्रिक मोटर द्वारे संचालित केली जाईल. या कालला 10kw पॉवरसह 500 Nm चा टार्क देखील मिळतो. 

PMV ने दावा केला आहे, की Eas-E इलेक्ट्रिक कारची ऑपरेटिंग किंमत 75 पैसे/किमी पेक्षाही कमी आहे. या इलेक्ट्रिक कारमध्ये ऑन बोर्ड नेव्हिगेशनसह क्रुझ कंट्रोल, रिमोट पार्किंग, डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. एवढेच नाही, तर या कारच्या सुरक्षिततेसंदर्भात कसल्याही प्रकारची तडजोड करण्यात आलेली नाही. या कारमध्ये हाय स्ट्रेंथ शीट मेटलसह  एअरबॅग आणि सीटबेल्ट देखील देण्यात आला, असेल्याचे कंपनीने म्हटले आहे. 

 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन