नवी दिल्ली : भारतामध्ये स्टार्टअपनी पारंपरिक कंपन्यांना टक्कर देणाऱ्या स्कूटर तयार केल्या आहेत. Twenty Two Motors या स्टार्टअपने लयभारी सुविधा असणारी भारतातील आजपर्यंतची सर्वात हुशार स्कूटर तयार केली असून तिची चोरी झाल्यास स्कूटर आपोआप बंद पडते. या स्कूटरचे नाव फ्लो आहे.
कंपनीने या इलेक्ट्रीक स्कूटरला पहिल्यांदा ऑटो एक्सपो 2018 मध्ये लाँच केले होते. केवळ 85 किलोचे वजन असणारी ही स्कूटर एका चार्जिंगमध्ये 80 किमी अंतर तोडते. तर या स्कूटरची टॉप स्पीड 60 किमी आहे. या स्कूटरमध्ये 2.1 किलोवॅटची इलेक्ट्रीक मोटर वापरलेली आहे. जी 90 न्युटन मिटर टॉर्क देते. भारतीय बाजारात ही स्कूटर जवळपास 74,740 हजार रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
चोरट्यांनी या स्कूटरची चोरी करण्याचा प्रयत्न केल्यास इंजिन किल या प्रणालीद्वारे ती आपोआप बंद पडते. यासाठी काही सेटींग्ज कराव्या लागतात. यानंतर ही स्कूटर आपल्या मालकास अचूक ओळखते.
काय आहे खास...
- FLOW मध्ये CBS(Combined Braking System) आहे. पुढच्या आणि मागच्या टायरमध्ये डिस्क ब्रेक दिले आहेत.
- स्कूटर मध्ये ट्यूबलेस टायर आहेत जे सुरक्षेसोबत मायलेज देण्य़ासाठी बनविले गेले आहेत.
- स्कूटर पूर्णपणे पाणी आणि धूळ प्रतिबंधक आहे.
- स्कूटरच्या फ्रेमला रोबोटने वेल्डिंग केले गेले आहे.
- बॉश कंपनीची पावरफूल DC मोटर लावलेली आहे.
- दोन हेल्मेट ठेवण्यासाठी जागा
- स्कूटरबाबत माहिती कळण्यासाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी देण्य़ात आली आहे.