मोटारींमध्ये ब्रेक हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. विविध प्रकारचे ब्रेक्स वा ब्रेक प्रणाली आज अस्तित्त्वात आलेलया आहेत, त्यात नवे नवे शोधही भर घालत आहेत. पण मुळात कार वा मोटार थांबवण्यासाठी जो ब्रेक वापरतात त्याला काय म्हणतात, तर त्याला सर्व्हिस ब्रेक असे म्हणतात. तो वापरताना अतिशय सावधपणे व योग्य पद्धतीने वापरला तर त्याचे आयुष्यही चांगले राहाते, तसेच त्याचा आवश्यक प्रभावही नीटपणे राहातो व त्याच्या देखभालीवरील अनावश्यक खर्च वा तो काढून नवा टाकण्याची वेळ कमी येते.
कारचा वेग कमी करणे, त्यासाठी सर्व चारच्या चार चाकांवर नियंत्रण ठेवणे व त्या पद्धतीने तो ब्रेक कार्यान्वित होणे, ब्रेक लावताना एक मोठी काळजी घ्यायची असते ती म्हणजे तुमच्या गाडीचा वेग किती आहे, तो ज्यावेळी कमी करावयाचा असतो, तेव्हा तो कशा प्रकाराने कमी करावा की ज्यामुळे ब्रेकचा वापर करतानाही ब्रेकवर कमी ताण येऊ शकतो,तसेच कार स्किट होण्यापासून वाचू शकते. अतिवेगात असताना ब्रेक अकस्मातपणे जोरात लावला गेला, त्यासाठी पँन्डलचा वापर पूर्ण दाब देऊन केला गेला तर कार स्किट होण्याची शक्यता असते. अता अशा स्थितीमध्ये नव्या शोधांमुळे कार स्किट होण्यापासून रोखणारी यंत्रणा वा प्रणाली विकसित झाली आहे. पण याचा अर्थ असा नवे की हवा तेव्हा हवा तसा ब्रेक कारला लावावा. अखेर कार ही एक जशी जबाबदारी आहे, तशीच ती एक सावधपणे हाताळण्याची वस्तू व साधन आहे. हे लक्षात घेतले गेले पाहिजे.
डिस्क ब्रेक्स , ड्रम ब्रेक्स हे दोन प्रमुख व पारंपरिक असलेले प्रकार आहेत. त्यात वाहनांमध्ये पर्यायी एक पद्थ दिलेली असते ती म्हणजे इमर्जन्सी ब्रेकिंगची. ही विशेष करून मागील चाकांना लागली जाते. तर नव्याने संगणकाद्वारे नियंत्रित केलेल्या अॅण्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम म्हणजे एबीएस या नव्या प्रकारच्या ब्रेकींग प्रणालीचीही भर पडली आहे. ब्रेक्समध्ये नवे शोध लागले तरी ते सुरक्षेसाठी असतात. याचा अर्थ कार कशीही वेगात असली तरी ती वाटेल तेव्हा थांबवा, असे होत नाही. ब्रेक म्हणजे मनाला आवर घालण्याचाच पर्यायी शब्द म्हणायला हवा. नव्या नव्या प्रकारच्या मोटारी जरी बाजारात दिसल्या तरी त्या आपण घेऊ शकतोच असे नाही, मनातील इच्छेला जसा त्यावेळी ब्रेक लावतो, तसाच ब्रेक प्रत्यक्ष कार चालवताना घालणे आवश्यक आहे.
रस्त्यावर कार चालवताना असणारा संयत व नियंत्रित वेग हे मनाच्या ब्रेकाचे एक स्वरूप तर प्रत्यक्षात जेव्हा ब्रेक लावायचा असतो तेव्हा त्या ब्रेक लावण्यासाठी समोर रस्त्यावर दिसणारी स्थिती त्याला कारणीभूत असते. अनेकदा ही स्थिती अचानक उद्भवत नसते, तिया स्थितीची कल्पना घेत ब्रेकचा संतुलीत, नियंत्रित व हळूवार वापर करत गाडीचा वेग आधीपासूनच नियंत्रित करणे गरजेचे आहे. एबीएस पद्धतीचे ब्रेक खूप चांगले असले तरी सतत अकस्मात जोरदार ब्रेक लावणे हे योग्य नाही, त्यामुळे ब्रेकचा वापर करताना किती हळूवारपणे कराल तितका चांगला, आतील प्रवाशांच्या पोटातील पाणीही हलू नये अशा प्रकारे वाहन चालवणे व त्यात ब्रेकचा वापर करणे हेच उत्तम ड्रायव्हरचे लक्षण समजावे.