ह्युंदाई मोटर्सची लक्झरी वाहनांची कंपनी जेनेसिसने आपली पहिली इलेक्ट्रीक एसयुव्ही Genesis GV60 चे डिझाईन सादर केले आहे. जेनेसिस कंपनीचे हे पहिले GV60 इलेक्ट्रीक वाहन आहे. या वर्षींच्या अखेरपर्यंत ही कार लाँच होणार आहे. (Genesis GV60, Hyundai’s luxury car brand’s first electric SUV, makes debut)
जेनेसिस GV60 एसयुव्ही ग्लोबल इलेक्ट्रीक मॉड्युलर प्लॅटफॉर्मवर (E-GMP) आधारित आहे. याचा वापर Hyundai Ioniq 5 आणि Kia EV6 मध्ये करण्यात आला आहे. GV80 आणि GV70 मॉडेलनंतर GV60 जेनेसिसची तिसरी एसयुव्ही आहे. GV80 आणि GV70 या इतर इंधनांच्या एसयुव्ही आहेत. जेनेसिस GV60 मध्ये 800V इलेक्ट्रिकल आर्किटेक्चरचा वापर करण्यात आला आहे. 350kW ची अल्ट्रा फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. GV60 ला जेनेसिस SUV ची लाईनअपमध्ये GV70 आणि GV80 च्या खाली सादर करण्यात आले आहे. या कारला जबरदस्त लूक देण्यात आला आहे. डिझाईन लँग्वेजचे नवीन रुप पहायला मिळेल.
शील्डच्या आकारात फ्रंट ग्रीलच्या दोन्ही बाजुला दोन सिग्नेचर क्वाड हेडलँप देण्यात आले आहेत. कंपनीचा नवीन लोगो देखील दिसत आहे. जेनेसिस नुसार मोठ्या ग्रीलमुळे वेगवान होण्यात मदत मिळेल आणि उच्च क्षमतेची बॅटरी थंड ठेवण्यास मदत मिळेल. यामध्ये सिंगल पॅनेल शेल हुडदेखील देण्यात आला आहे.
जेनेसिस GV60 च्या इंटेरिअरमध्ये Hyundai Ioniq 5 आणि Kia EV6 सारख्याच समानता आहेत. ड्युअल स्क्रीन डिजिटल डिस्प्ले डॅशबोर्डवर लावण्यात आला आहे. एका मोठ्या सेंटर कंसोलमध्ये स्टोरेज स्पेस आणि वाहनाचे कंट्रोल दोन्ही देण्यात आले आहेत. या ईलेक्ट्रीक एसयुव्हीमध्ये 58kWh आणि 77.8kWh ची बॅटरी देण्यात येईल. यामुळे ही एसयुव्ही 480 हून अधिक किमीची रेंज देईल. रियर-व्हील-ड्राइव सिंगल इंजिन मॉडेल 167 hp आणि 214 hp ताकदीचे लाँच केले जाईल. तसेच दोन इंजिन, फोर व्हील ड्राईव्ह मॉडेल 301 hp ताकद प्रदान करेल.