नवी दिल्लीः भारतीय नियामक आणि विकास प्राधिकरणा(IRDA)नं कार आणि दुचाकी वाहनांवरचा थर्ड पार्टी प्रीमियम वाढवण्याचा प्रस्ताव आणला आहे. परंतु ज्यांनी तीन ते पाच वर्षांचा गाड्यांचा विमा काढला आहे, त्याच्यात कोणताही बदल होणार नाही. IRDAच्या प्रस्तावानुसार, 1000 सीसीच्या क्षमतेच्या कारचा थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम 2120 रुपये केला पाहिजे. पहिल्यांदा हा 1850 रुपये होता. अशाच प्रकारे 1000 सीसी आणि 1500 सीसी असणाऱ्या कारच्या प्रीमियममध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आहे.इरडाच्या मते, 2863 रुपयांवरून वाढून 3300 रुपये केला पाहिजे. तर 1500 सीसीहून जास्त क्षमता असलेल्या कारच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियमध्ये कोणत्याही बदलाचा प्रस्ताव नाही. दुचाकी वाहनांच्या प्रीमियममध्येही बदल होणार आहे. इरडाच्या प्रस्तावानुसार, 75 सीसी क्षमतेच्या दुचाकी वाहनांच्या थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम वाढवून 582 रुपये केला पाहिजे. पहिल्यांदा या प्रीमियमसाठी 427 रुपये मोजावे लागत होते. अशाच प्रकारे 75 सीसी आणि 150 सीसीमधील वाहनांच्या प्रीमियममध्ये बदल करण्याचं यात प्रस्तावित आहे.इरडाच्या प्रस्तावानुसार, 720 रुपयांवरून वाढवून तो 750 रुपये केला पाहिजे. 150 सीसी आणि 350 सीसीच्या क्षमतेच्या दुचाकी वाहनांचा इन्शुरन्स प्रीमियम 985 रुपयांवरून 1193 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच 350 सीसीच्या दुचाकी वाहनांचा थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये बदलाचा कोणताही प्रस्ताव नाही. या 2323 रुपये आहे. 1500 सीसी इंजिनहून अधिक क्षमता असलेल्या कारच्या प्रीमियममध्ये कोणताही बदलाचा प्रस्ताव नाही. खरं तर आता त्या गाड्यांचं इन्शुरन्स 7890 रुपये आहे. जोपर्यंत नवे दर लागू होणार नाही, तोपर्यंत आपल्याला जुन्या दरानं प्रीमियम भरावा लागणार आहे. 29 मेपर्यंत या नव्या दरासंबंधीच्या प्रस्तावावर चर्चा होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
लवकरच वाढणार आपल्या गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम, IRDAचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 2:42 PM