सध्याच्या दिवसांमध्ये कंपन्या आपली वाहने अनेक व्हेरिएंट्समध्ये लॉन्च करतात. ग्राहकांच्या गरजेनुसार एकाच गाडीमध्ये बेसपासून टॉपपर्यंत निवडण्यासाठी अनेक ऑप्शन असतात. त्यामध्ये इंजिन आणि गिअरबॉक्सशिवाय फिचर्सच्या आधारावरही विभागणी होते. अशा परिस्थितीत जेव्हा बहुतांश ग्राहक नवीन गाडी खरेदी करण्यासाठी जातात, तेव्हा बजेटनुसार स्वस्त कार खरेदी करणे पसंद करतात. त्यासाठी ते काही फीचर्ससोबत तडजोडही करतात. मात्र असे करणे बऱ्याचदा तोट्याचे ठरते. आज आम्ही तुम्हाला तीन अशा फीचर्सबाबत माहिती देणार आहोत जे कारमध्ये असणे आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी लाखभर रुपये भरावे लागले तरी हरकत नाही. हे फीचर्स पुढीलप्रमाणे.
क्रूज कंट्रोल - क्रूज कंट्रोलचं फिचर तुमचा दीर्घ प्रवास आरामदायक बनवते. या फिचर्सच्या माध्यमातून एक बटन दाबून तुम्ही स्पीड सेट करू शकता. त्यानंतर तुम्ही रेसचा पॅडल न दाबताही कार त्याच वेगाने चालत राहते. या फीचरचा वापर हा बहुतांशी हायवेवर केला जातो.
स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल - तुमच्या गाडीमध्ये स्टीयरिंग माऊंटेड कंट्रोलसुद्धा ड्रायव्हिंग एक्स्पिरियन्सला सुरेख बनवतो. गाडीच्या स्टियरिंगवर मिळणाऱ्या बटणांच्या माध्यमातून तुम्ही म्युझिक सिस्टमची आवाज कमी अधिक करण्यासारखी अनेक कामं करता येतात. त्यामुळे तुमचं लक्ष विचलित होत नाही. तसेच तुम्ही आरामात ऑडियो सिस्टिम कंट्रोल करू शकतात.
रियर वायपर - गाड्यांच्या रियर विंडस्क्रीवर अनेकदा धूळ बसते. पाऊस आणि थंडीच्या मोसमात त्यावर दवही साचते. रियर वायपरच्या माध्यमातून तुम्ही हे आरामात साफ करू शकता. तसेच मागीलही चांगला व्ह्यू पाहू शकता.