शहरं
Join us  
Trending Stories
1
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
2
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
3
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?
4
मृत्यूनंतर चार वर्षांनी तो बनणार बाप, हायकोर्टानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय 
5
पिंपरीतील लॉजमध्ये धक्कादायक घटना; प्रेयसीवर वार करून तरुणाने संपवलं जीवन!
6
गुरू ग्रहावर एलियनचे अस्तित्व? NASA ने लॉन्च केले मिशन, कोणती माहिती मिळणार? पाहा...
7
पुण्यात भाजपाला आणखी एक धक्का बसणार, माजी खासदार तुतारी फुंकणार? 
8
वृद्ध दाम्पत्यानं पाण्याच्या टाकीत उडी मारून संपवलं जीवन, समोर आलं धक्कादायक कारण
9
श्वास घेण्यास त्रास; प्रकृती खालावल्याने भाजप आमदाराला एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईला हलवले!
10
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
11
Kalyan: कल्याणमध्ये नामांकित बिल्डरकडून मिस फायर? बिल्डरसह मुलगा जखमी, पोलिसांकडून तपास सुरू
12
Hardik Pandya सोबत दिसणारी ही सुंदर तरुणी कोण? व्हायरल झालेल्या फोटोंमुळे रंगली चर्चा
13
केंद्र सरकारची कारवाई; 'हिज्ब-उत-तहरीर' दहशतवादी संघटनेवर घातली बंदी
14
'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!
15
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
16
रुटचे द्विशतक, ब्रूकचे त्रिशतक! ४०० पार भागीदारी; पहिल्या सामन्यात इंग्लंडची 'दिवाळी', ७ नवे विक्रम
17
सोने ८०० रुपयांनी स्वस्त, सणासुदीतही भाव कमीच राहणार, त्यानंतर अशी उसळी घेणार की...
18
Israel Iran War: इराणवर हल्ला कधी केला जाणार? इस्रायल बैठकीत घेणार अंतिम निर्णय
19
काश्मीरमध्ये समिकरण बदलले, नॅशनल कॉन्फ्रन्सने स्वबळावर गाठला बहुमताचा आकडा, काँग्रेसची साथ सोडणार?
20
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...

'ही' इलेक्ट्रिक स्कूटर १०,००० रुपयांनी स्वस्त, फुल चार्ज केल्यावर १७० किमी धावणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 7:56 PM

iVOOMi Electric Scooters : आता इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी iVOOMi ने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरवर दहा हजार रुपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे. 

iVOOMi Electric Scooters : देशात नवरात्रीपासून सणासुदीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सणासुदीचा हंगाम जवळ आला की, प्रत्येक कंपनी विक्रीला चालना देण्यासाठी नवनवीन उत्तम ऑफर्स घेऊन येत असते. आता इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादक कंपनी iVOOMi ने आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरवर दहा हजार रुपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा केली आहे. 

दहा हजार रुपयांपर्यंतच्या सवलतीव्यतिरिक्त, iVOOMi ग्राहकांच्या सोयीसाठी कर्ज पर्याय आणि शून्य डाउन पेमेंट पर्याय देखील प्रदान करत आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कर्जावर कोणतेही व्याज देण्याची गरज नाही, इतकेच नाही तर ग्राहकांसाठी १४११ रुपये प्रति महिना सुरुवातीला ईएमआयची (EMI) सुविधा देखील आहे. कंपनीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरवर दहा हजार रुपयांपर्यंत बंपर सवलत मिळत आहे. याशिवाय, कंपनी iVOOMi S1 सीरीजवर पाच हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. दरम्यान,  या इलेक्ट्रिक स्कूटरच्या ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचे झाले तर, ही स्कूटर एका फूल चार्जमध्ये १७० किलोमीटरपर्यंतचे अंतर कापू शकते. याशिवाय, या स्कूटरमध्ये दिलेल्या बॅटरीला IP67 (डस्ट अँड वॉटर रेसिस्टंस) रेटिंग मिळाली आहे. दुसरीकडे, कंपनीची एस 1 मालिका देखील खूप चांगली ड्रायव्हिंग रेंज ऑफर करत आहे.

इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत किती?या इलेक्ट्रिक स्कूटरचे 2.1kWh आणि 3.1kWh असे दोन व्हेरिएंट्स आहेत. या व्हेरिएंट्सच्या किंमती अनुक्रमे ९९ हजार ९९९ रुपये आणि १ लाख ९ हजार ९९९ रुपये आहेत. माक्ष,  2.1kWh व्हेरिएंट दहा हजार रुपयांच्या सवलतीत आणि 3.1kWh व्हेरिएंट पाच हजार रुपयांच्या सूटसह मिळेल.

कधीपर्यंत असणार ऑफर?iVOOMi द्वारे ऑफर करण्यात आलेली ही फेस्टिव्ह सेल डील्स केवळ मर्यादित काळासाठी आहेत. तुम्ही कंपनीच्या डीलर्सना भेट देऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकता, परंतु लक्षात असू द्या की, ही डिल्स फक्त नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत व्हॅलिड आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग