शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

iVOOMi Energy Electric Scooter : या महिन्यात बाजारात येणार नवीन इलेक्ट्रिक स्कूटर, सिंगल चार्जवर 100 किमी रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2022 9:54 AM

iVOOMi Energy Electric Scooter : कंपनीने 30 मे पासून आपल्या S1 ई-स्कूटरची बुकिंग सुरू केली आहे आणि जूनच्या मध्यापासून त्याची डिलिव्हरी सुरू करणार आहे.

नवी दिल्ली : इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी iVOOMi एनर्जी एक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणणार आहे. या स्कूटरची डिलिव्हरी कंपनी जूनच्या मध्यापासून सुरू करण्यास असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, या स्कूटरच्या खरेदीसाठी उत्सुक असणाऱ्या लोकांसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे.

कंपनीने 30 मे पासून आपल्या S1 ई-स्कूटरची बुकिंग सुरू केली आहे आणि जूनच्या मध्यापासून त्याची डिलिव्हरी सुरू करणार आहे. महाराष्ट्रस्थित कंपनीने या वर्षी मार्चमध्ये दोन ई-स्कूटर मॉडेल S1 आणि Jeet बाजारात आणले होते. Jeet ची किंमत 82,990 रुपये आणि Jeet Pro ची किंमत 95,990 रुपये आहे. याचबरोबर,  S1 ची किंमत 84,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, S1 ई-स्कूटर ज्याला इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (ICAT) कडून मंजुरी मिळाली आहे. या स्कूटरची डिलिव्हरी जूनच्या मध्यापासून केली जाईल.

iVOOMi एनर्जीचे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय सुनील बन्सल म्हणाले, "आम्हाला खात्री आहे की S1 इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये एक गेम चेंजर ठरेल आणि आम्ही आमच्या सॉलिड-स्टेट इलेक्ट्रिक स्कूटरच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्याची संधी म्हणून पाहतो. जी उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव आणि कार्यक्षमता प्रदान करते."

ताशी 50-54 किलोमीटरचा वेग भारतात डिझाइन आणि निर्मिती केलेली  S1 एक 2kW इलेक्ट्रिक मोटरद्वारे संचालित आहे, जी ताशी 50-54 किलोमीटरचा वेग प्रदान करते. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 60V, 2kWh स्वॅपॅबल ली-आयन बॅटरी पॅक आहे, जो खूप कमी वेळेत बॅटरी चार्ज करतो. यामुळे घरात बॅटरी चार्ज करण्याच्या त्रासापासून दिलासा मिळतो.

टेस्ट राइड सुरूकंपनीच्या म्हणण्यानुसार, पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 3-4 तास लागतात आणि एकदा बॅटरी पूर्णपणे चार्ज झाली की, ती 100 किमी पर्यंत राइडिंग रेंज देते. कंपनीने सांगितले की, ही इलेक्ट्रिक स्कूटर 28 मे पासून पुणे, नागपूर, गोंदिया, मुंबई, नांदेड, कोल्हापूर, इचलकरंजी, अहमदनगर, सुरत, भावनगर, आदिपूर, कच्छ सारख्या शहरांमधील अनेक टचपॉइंट्सवर टेस्ट राइडसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना 749 रुपयांमध्ये या ई-स्कूटरची टेस्ट राइड प्री-बुक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगbusinessव्यवसाय