नवी दिल्ली : भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर निर्माता कंपनी iVoomi Energy ने S1 इलेक्ट्रिक स्कूटरची नवीन सीरीज S1 80, S1 100 आणि S1 240 लाँच केली आहे. Ivoomi S1 लाइन-अप अनेक गरजा पूर्ण करण्यासाठी अपग्रेड करण्यात आल्या आहेत. किंमती 69,999 रुपयांपासून सुरू होतात आणि 1.21 लाख एक्स-शोरूमपर्यंत जातात.
या स्कूटरची खास गोष्ट म्हणजे एकदा फूल चार्ज केल्यानंतर ती 240 किमी पर्यंत धावू शकते, असे कंपनीचा दावा आहे. जर कंपनीने दावा केलेली रेंज खरी ठरली, तर स्कूटर भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक रेंज असलेल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या यादीत सामील होईल. मात्र, सध्याची S1 ई-स्कूटर अजूनही विक्रीसाठी आहे आणि ती 85,000 रुपयांमध्ये (एक्स-शोरूम) उपलब्ध आहे.
तीन मॉडेल्समध्ये येईल स्कूटरiVoomi S1 240 इलेक्ट्रिक स्कूटर ही टॉप-स्पेक व्हर्जन आहे आणि 240 किमी रेंज (IDC) देऊ शकते. मॉडेलला 4.2 kWh ट्विन बॅटरी पॅक मिळतो आणि अतिरिक्त टॉर्कसह 2.5 kW मोटर (3.3 bhp) देण्यात आली आहे. याउलट, एंट्री-लेव्हल S1 80 इलेक्ट्रिक स्कूटर 1.5 kWh बॅटरी पॅकसह करते, जे एका चार्जवर 80 किमी (IDC) ची रेंज देऊ शकते. S1 80 मध्ये हब-माउंटेड 2.5 kW मोटर देखील मिळते, त्याचा टॉप स्पीड 55 किमी प्रति तास असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या दिवसांपासून सुरु होणार विक्रीiVoomi Energy आपल्या डीलरशिप नेटवर्कवर 1 डिसेंबर 2022 पासून नवीन S1 ई-स्कूटर रेंजची विक्री सुरू करणार आहे. तसेच, ऑन-रोड किमतीच्या 100 टक्क्यांपर्यंत सुलभ वित्त पर्यायांसाठी कंपनीने विविध वित्तीय संस्थांशी करार केला आहे. कंपनीने देशाच्या दक्षिणेकडील प्रदेशात आपला विस्तार करण्याची योजना देखील जाहीर केली आहे आणि वर्षाच्या अखेरीस या राज्यांमध्ये सर्व स्कूटर उपलब्ध देणार आहे.
तीन रायडिंग मोड्ससर्व व्हेरिएंटमध्ये इको, रायडर आणि स्पोर्ट तीन रायडिंग मोड्स येतात. ही स्कूटर पीकॉक ब्लू, नाईट मरून आणि डस्की ब्लॅक या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. मॉडेलमध्ये जीपीएस ट्रॅकर आणि मॉनिटरिंग सिस्टमसह नवीन 'फाइंड माय राइड' फीचर्स देखील आहे. स्कूटरच्या लॉन्चबद्दल भाष्य करताना, iVOOMi एनर्जीचे एमडी आणि सह-संस्थापक सुनील बन्सल म्हणाले की, "आम्ही एक इंजिनिअरिंग-ओरिएंटेड टेक्नॉलॉजी सोल्यूशन ब्रँड म्हणून विस्तार करत आहोत आणि पुढील स्टेप म्हणजे स्कूटरमध्ये अधिक टेक्नॉलॉजीला जोडणे आहे."