नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. बाजारात इलेक्ट्रिक टू व्हीलर सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या किंमती, फीचर्स आणि रेंज असलेल्या स्कूटर मोठ्या संख्येने उपलब्ध आहेत. यापैकी एक आहे कबीरा मोबिलिटीची (Kabira Mobility) इलेक्ट्रिक स्कूटर कोलेगिओ (Kollegio), जी हलक्या वजनाची आणि युनिक डिझाइन केलेली स्कूटर आहे.
जर तुम्ही कमी बजेटमध्ये लाँग रेंजची इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर किंमत, रेंज, फीचर्स, टॉप स्पीड यासह Kabira Mobility Kollegio संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या. कबीरा मोबिलिटीने ही इलेक्ट्रिक स्कूटर 45,990 रुपये एक्स-शोरूम किंमतीसह बाजारात आणली आहे. ऑन-रोड झाल्यानंतर ही किंमत 49,202 रुपये होते.
Kabira Mobility Kollegio Battery and Motorया इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 48V, 24Ah क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे. या बॅटरीसह कंपनीने 250 W पॉवर आउटपुटसह BLDC इलेक्ट्रिक मोटर जोडली आहे. या बॅटरी पॅकवर कंपनी 1 वर्षाची वॉरंटी देते. बॅटरी चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर हा बॅटरी पॅक 4 तासांत पूर्ण चार्ज होतो.
Kabira Mobility Kollegio Range and Top Speedकोलेगियो इलेक्ट्रिक स्कूटरच्या रेंजबद्दल कंपनीचा दावा आहे की, एकदा फूल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर 100 किमीची रेंज देते. या रेंजसह 25 किमी प्रतितास इतका टॉप स्पीड मिळत आहे.
Kabira Mobility Kollegio Braking and Suspensionकबीरा मोबिलिटीने या इलेक्ट्रिक स्कूटरच्या फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक आणि रिअर व्हीलमध्ये ड्रम ब्रेकचे कॉम्बिनेशन दिले आहे, ज्यामध्ये कॉम्बी ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे. सस्पेन्शन सिस्टिममध्ये स्प्रिंग लोडेड सस्पेन्शन सिस्टिम समोर देण्यात आली आहे.
Kabira Mobility Kollegio Featuresकोलेजिओ इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये मिळणाऱ्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये रिमोट स्टार्ट, पुश बटन स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल ट्रिप मीटर, डिजिटल स्पीडोमीटर, जिओ फेन्सिंग, अँटी थेफ्ट अलार्म, लाईव्ह ट्रॅकिंग, इंटेलिजेंट अँटी थेफ्ट आणि एसओएस, ट्रिप हिस्ट्री, राइड स्टॅटिक्स, मोबाइल अॅप्लिकेशन, एलईडी हेड लाईट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिग्नल लॅम्प, लो बॅटरी इंडिकेटर यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.