कावासाकी मोटर्सने (Kawasaki Motors) ग्राहकांसाठी Kawasaki Ninja 300 लाँच केली आहे. कँडी लाइम ग्रीन, लाइम ग्रीन आणि मेटॅलिक मूनडस्ट ग्रे या तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये तुम्ही 300 सीसी सेगमेंटची ही बाईक खरेदी करू शकता. याशिवाय, कंपनीने या बाईकच्या 2023 मॉडेलचे परफॉर्मन्स आणि राइडिंग डायनॅमिक्स देखील पूर्वीच्या तुलनेत सुधारले आहेत.
कावासाकी निंजा 300 च्या 2023 च्या मॉडेलची किंमत कंपनीने 3 लाख 43 हजार रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, लाइम ग्रीन पेंट थीमसह येणाऱ्या नवीन निंजा 300 मध्ये बेस कलर लाइम ग्रीन ठेवण्यात आला आहे. पण ही बाईक ब्लॅक ग्राफिक्स आणि रेड हेडलाइटसह आणण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की, या बाईकचा कँडी लाइम ग्रीन पेंट व्हेरियंट ड्युअल टोन कलर थीमसह येईल.
बाईकच्या साइड पॅनल्स आणि इंधन टाकीवर अपडेटेड ग्राफिक्स दिसतील. याशिवाय, मेटॅलिक मून डस्ट ग्रे व्हेरिएंट डॉर्क मॉर्डन ग्रे टोनसह येईल, तसेच पॅनेल आणि क्राउलवर ग्रीन कलर्ड डिझाइन पाहायला मिळणार आहे. या बाईकमध्ये कंपनीने 296 सीसी फोर स्ट्रोक पॅरलल ट्विन, लिक्विड कूल्ड 8 व्हॉल्व्ह इंजिन दिले आहे, जे फ्युएल इंजेक्शन सिस्टमसह येते.
दरम्यान, इंजिन 39PS ची पॉवर आणि 26.1 Nm टॉर्क जनरेट करते. उत्तम परफॉर्मेंससाठी बाईकला हीट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी, ड्युअल चॅनल AS सह रेस डिराइव्ड क्लच टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे, जी स्मूथ शिफ्ट फील आणि ड्युअल थ्रॉटल व्हॉल्व्ह सुनिश्चित करते. याचबरोबर, बाईकला रेसिंग टेक्नॉलॉजीद्वारे प्रेरित असिस्ट आणि स्लिपर क्लच मिळते, जे बॅक-टॉर्क लिमिटर आणि सेल्फ-सर्व्हो मेकॅनिझम दोन्ही म्हणून काम करते. हे लाइटर क्लच लीव्हर सक्षम करण्याचा दावा करते.