मुंबई : कार खरेदी केल्यानंतर तिच्यासाठी ढिगभर अॅक्सेसरीज घेतो. मात्र, यापैकी बऱ्याचशा वस्तू या केवळ दिखाव्यासाठीच घेतलेल्या असतात. उपयोगाच्या वस्तू फार कमी असतात. आज आम्ही एक अशी बहुपयोगी वस्तू तुम्हाला सांगणार आहेत जी संकटकाळामध्ये खूप उपयोगाची आहे.
ही वस्तू म्हणजे टायर प्रेशर गेज. याचे महत्वाचे काम म्हणजे टायरमधील हवेचा दाब तपासणे. मात्र यासह तो आणखी चार कामांसाठी उपयोगात आणता येतो.
- या टायर प्रेशर गेजमध्ये LED लाईट दिली गेली आहे. जर एखादे वाहन रात्रीच्यावेळी बंद पडल्यास बॉनेट खोलून इंजिन तपासण्यासाठी उपयोगी येते. तसेच इतर कामांवेळीही उपयोगी.
- टायर प्रेशर गेजमध्ये सीट बेल्ट कापण्यासाठी कटरही दिला आहे. अपघातानंतर किंवा संकटावेळी लावलेला सीटबेल्ट निघत नसेल तर हा कटर खूप उपयोगाचा ठरतो.
- एखाद्या वेळी अपघात झाला किंवा आग लागली आणि दरवाजा उघडत नसेल तर आतून काच फोडून बाहेर पडणे खूप कठीण असते. अशावेळी टायर प्रेशर गेजला असलेला हॅमरद्वारे काच फोडू शकतो.
- टायर प्रेशर गेजमध्ये दिशा दर्शक यंत्रही देण्यात आले आहे. यामुळे एखाद्या निर्जन ठिकाणी, किंवा घनदाट जंगलामध्ये अडकला असाल तर दिशा समजू शकते.
कुठे मिळेल...अशा प्रकारच्या बहुपयोगी वस्तू मोठ्या शहरामध्येच मिळू शकतात. मात्र, ऑनलाईनवर कुठेही मिळू शकतात. या टायर प्रेशर गेजची किंमत 400 रुपयांच्या आसपास आहे.