नवी दिल्लीः ह्युंदाई एक खास इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन आली आहे. ह्युंदाईची ही स्कूटर इतर स्कूटरांच्या तुलनेत जरा हटकेच आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर ह्युंदाईनं 2017मध्ये प्रदर्शनासाठी ठेवली होती. कंपनीनं ही स्कूटर कार खरेदी करणाऱ्यांना सवलत देण्याच्या उद्देशानं लाँच केली आहे. या खास इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फ्रंट आणि रिअर लाइट्स, लिथियम आयन बॅटरी देण्यात आली असून, व्हील ड्राइव्ह सारख्या सुविधांनीही ती सुसज्ज आहे.कंपनीच्या म्हणण्यानुसार, भविष्यात ह्युंदाई आणि किओ मोटार्सच्या गाड्यांबरोबर ही इलेक्ट्रिक स्कूटरही मिळणार आहे. या स्कूटरचा उपयोग आपण कार लांब पार्किंग केलेली असल्यास तिथपर्यंत जाण्यासाठी होणार आहे. यासाठी कारमध्ये एक निर्धारित जागा देण्यात आली असून, ज्यात ही इलेक्ट्रिक स्कूटर सहजगत्या ठेवता येणार आहे. ह्युंदाईनं या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 10.5 Ah लिथियम-आयन बॅटरी दिली असून, एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ती 20 किलोमीटरपर्यंत धावणार आहे. तिचा टॉप स्पीट 20 किलोमीटर प्रतितास आहे.विशेष म्हणजे कार चालवताना ही इलेक्ट्रिक स्कूटर कारमध्ये निर्धारित केलेल्या जागेत ठेवता येणार आहे. वाहन चालवत असताना बॅटरीतून निर्माण होणाऱ्या विजेवर ही स्कूटर आपोआप चार्ज होणार आहे. या इंटिग्रेटेड इलेक्ट्रिक स्कूटरचं वजन 7.7 किलोग्राम आहे. या स्कूटरला तीन ठिकाणी दुमडण्यात आलं आहे. वजन कमी असण्याबरोबरच तिला तीन भागात दुमडण्यात आल्यानं ती हातातून नेणंही शक्य होणार आहे. फीचर्स या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये एक डिजिटल डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात स्पीड आणि बॅटरीसह इतर माहिती मिळणार आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर या स्कूटरनं वाहतूक करण्यासाठी गरजेपुरती एलईडी हेडलाइट आणि दोन टेललाइट देण्यात आल्या आहेत. तसेच ह्युंदाईनं यात रिजेनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमचाही अंतर्भाव केला आहे. त्यामुळे स्कूटरचा वेग 7 टक्क्यांनी वाढणार आहे.
ना चार्जिंगची काळजी, ना पार्किंगची चिंता; 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर हातात घेऊनही फिरू शकता!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 4:47 PM