दक्षिण कोरियाची प्रमुख वाहन निर्माता कंपनी किया (Kia) ने नव्या जनरेशनची Niro (निरो) एसयुव्ही सादर केली आहे. सियोल मोबिलिटी शोमध्ये ही इलेक्ट्रीक कार दाखविली आहे. ही फेसलिफ्ट आहे परंतू आधीपेक्षा जास्त बोल्ड लूक दाखविणारी आहे. ही एसयुव्ही 5 डिसेंबरपर्यंत शोकेस केली जाणार आहे. या कारचे डिझाईन 2019 HabaNiro (हबानिरो) कॉन्सेप्ट काररून प्रेरित आहे.
नव्या निरोच्या सिग्नेचर टायगर नोझ ग्रिलला रिडिझाईन केले गेले आहे. कारची फ्रंट ग्रिल आता हुडच्या खालून फेंडरपर्यंत गेलेली आहे. हार्टबीट एलईडी डे टाईम रनिंग लाईट्स देण्यात आले आहेत. एकूणच निरो एक स्टायलिश आणि बोल्ड क्रॉसओव्हर लुक आणि हाय टेक टू टोन बॉडीसोबत दाखविण्यात आली आहे. कारच्या रिअर बुमरँगच्या आकाराची रिअर टेललाईट देण्यात आली आहे.
निरोच्या इंटेरिअररमध्ये देखील मोठे बदल केले आहेत. यामध्ये नवीन डॅशबोऱ्ड किया EV6 सारखा आहे. यामध्ये ड्युअल स्क्रीन आहे, दोन सेगमेंटमध्ये देण्यात आली आहे. त्याच्या खाली एक फ्लोटिंग सेंटर कन्सोल आहे, याच्या मध्यावर इलेक्ट्रॉनिकक गिअरशिफ्ट व्हील देण्यात आले आहे. ऑडिओ व्हिज्युअल स्क्रीन आणि एअर व्हेंट मॉडर्न डॅश डिझाईनचे डायोग्नल गॅप्समध्ये देण्यात आले आहे. अँबिअंट मूड लायटिंग खूप दिलखेचक आहे, जो हे इंटेरिअर खूप खास बनवितो.
ही कार हायब्रिड असली तरी ड्रायवव्हरच्या गरजेनुसार ती इलेक्ट्रीकमध्ये आपोआप स्विच होते. याला ग्रीनझोन ड्रायव्हिंग मोड म्हटले आहे. म्हणजे तुम्हाला हवी तेव्हा ती कार इलेक्ट्रीक होते. कियाने नव्या निरो कारच्या इंजिनांच्या रेंजबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. ही एसयुव्ही हायब्रिड, प्लग इन हायब्रिड किंवा इलेक्ट्रीक व्हर्जनमध्ये येईल की नाही ते कंपनीने कळविलेले नाही. ही कार पुढील वर्षी दुसऱ्या सहामाहित बाजारात येण्याची शक्यता आहे.