शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

Kia ने कारच्या किमती वाढवल्या; EV6, Carens, Sonet आणि Seltos खरेदी 1 लाखांपर्यंत महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 13:20 IST

Kia Price Hike : तुम्हीही किया मोटर्स कार घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या कंपनीने कोणत्या कारची किंमत किती वाढवली आहे.

नवी दिल्ली : किया मोटर्सने (Kia Motors) नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातच आपल्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. या वाढीनंतर आता ग्राहकांना कंपनीच्या कार खरेदी करण्यासाठी 1 लाख रुपये अधिक द्यावे लागतील. दरम्यान, तुम्हीही किया मोटर्स कार घेण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या कंपनीने कोणत्या कारची किंमत किती वाढवली आहे.

KIA EV 6 Price Hikeकिया मोटर्सने ज्या मॉडेलची किंमत सर्वात जास्त वाढवली आहे, ते किया EV6 आहे, ज्याची GT Line आणि GT Line AWD टॉप मॉडेल्स 1 लाख रुपयांपर्यंत महाग झाली आहेत. किया EV6 ची किंमत 60.95 लाख रुपयांपासून (एक्स-शोरूम, दिल्ली) सुरू होते, जी टॉप-स्पेक मॉडेलसाठी 65.95 लाखांपर्यंत जाते.

KIA Seltos Price Hikeकिया सेल्टोस एसयूव्ही आपल्या सेगमेंटमधील लोकप्रिय एसयूव्हीमध्ये गणना केली जाते, ज्यामध्ये कंपनीने 50,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत वाढवली आहे. या कारच्या डिझेल इंजिन व्हेरिएंटवर 50 हजार रुपयांची ही वाढ लागू होईल. कंपनीने किया सेल्टोसच्या पेट्रोल इंजिन व्हेरिएंटमध्ये 20,000 रुपयांनी वाढ केली आहे, तर त्याच्या टर्बो पेट्रोल इंजिन व्हेरिएंटच्या किंमतीत 40,000 रुपयांपेक्षा जास्त वाढ केली आहे. किया सेल्टोसची किंमत 10.69 लाख रुपयांपासून सुरू होते, जी टॉप मॉडेलसाठी 19.15 लाख रुपयांपर्यंत जाते. या किंमती एक्स-शोरूम दिल्लीमधील आहेत.

KIA Sonet Price Hikeकिया सोनेट एसयूव्ही खरेदी करण्यासाठी ग्राहकाला 20 ते 40 हजार रुपये जास्त खर्च करावे लागतील. कंपनीने कियाच्या 1.5 लीटर नॅचरली एस्पिरेटेड व्हेरिएंटच्या किमतीत 20,000 रुपयांनी वाढ केली आहे. 1.0 लीटर टर्बो पेट्रोल व्हेरिएंटवर 25 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सोनट डिझेल वेरिएंटबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने त्याची किंमत 40,000 रुपयांनी वाढवली आहे.किया सोनेटच्या किमतीत वाढ झाल्यानंतर कारची किंमत 7.69 लाख रुपयांवरून 14.39 लाख रुपये करण्यात आली आहे. 

Kia Carens Price hikeकिया मोटर्सने आपल्या एकमेव एमपीव्ही किया कॅरेन्सची किंमत 20 रुपयांवरून 45 हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे. किया कॅरेन्सचेन इंजिन व्हेरिएंट आहेत, ज्यामध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन व्हेरिएंटमध्ये 20 हजार रुपयांनी, 1.4 लिटर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये 25 हजार रुपयांची आणि डिझेल इंजिन व्हेरिएंटमध्ये 45 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. किमतीत वाढ झाल्यानंतर किया कॅरेन्सची नवीन सुरूवातीची किंमत 10.20 लाख रुपयांपासून ते 18.45 लाख रुपयांपर्यंत झाली आहे. ही किंमत दिल्लीतील एक्स-शोरूममधील  आहे. 

टॅग्स :Kia Motars Carsकिया मोटर्सKia Sorento Suvकिया सोरेंटो एसयूवीAutomobile Industryवाहन उद्योग