किआ इंडियाने (Kia India) 2019 मध्ये सेल्टोस लाँच केली होती. सेल्टोस लाँच झाल्यापासून किआचे सर्वाधिक विक्री होणारे ही कार ठरली आहे. चार वर्षांनंतर आता कंपनी या कारचे फेसलिफ्ट मॉडेल अपडेटेड डिझाइन आणि नवीन फीचर्ससह लाँच करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, Kia Seltos Facelift मॉडेल टेस्टिंग दरम्यान अनेक वेळा स्पॉट करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सद्वारे समोर आलेल्या माहितीनुसार, कंपनी पुढील महिन्यात 4 जुलै रोजी आपल्या कारचे अनावरण करेल, तर ऑगस्टमध्ये ही कार लाँच करण्याची योजना आहे. पुढील महिन्यात या कारचे अनावरण झाल्यानंतर कंपनी आपल्या कारचे बुकिंग सुरू करेल, अशी शक्यता आहे.
किआने गेल्या वर्षी या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन दक्षिण कोरियामध्ये लाँच केले होते. त्यामुळे ही कार भारतातही अशाच बदलांसह लाँच केली जाऊ शकते. या कारच्या पुढील आणि मागील डिझाइनमध्ये बदल पाहायला मिळतील अशी अशी शक्यता आहे.
कारच्या पुढील बाजूस नवीन मॅश पॅटर्नसह एक मोठी ग्रिल पाहायला मिळेल. कारच्या बाजूंना कोणतेही बदल करण्यात आले नाहीत. या कारमध्ये 18 इंची अलॉय व्हील्स उपलब्ध असतील. मागील बाजूस मोठे एलईडी टेललॅम्पही दिले जातील.
फीचर्सभारतात लाँच होणाऱ्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये ट्विन स्क्रीन सेटअप पाहायला मिळेल. प्रत्येक स्क्रीनचा आकार 10.25 इंचापर्यंत असू शकतो. ADAS फीचर आणि पॅनोरॅमिक सनरूफ सारखे फीचर्सही या कारमध्ये पाहायला मिळतात.
इंजिनया कारमध्ये सध्याच्या मॉडेलप्रमाणेच पेट्रोल आणि टर्बो डिझेल इंजिन पाहायला मिळू शकते. याशिवाय कंपनी नवीन 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील लाँच करू शकते. ही कार 6 स्पीड मॅन्युअल किंवा 6 स्पीड ऑटो क्लच मॅन्युअल ट्रान्समिशनसह लाँच होते की नाही, हे पाहण्यासारखे आहे.