कियाने भारतात फार कमी वेळात मोठी मजल गाठली आहे. ह्युंदाईचीच सह कंपनी असल्याने कियाला त्याचा फायदा झाला आहे, हे नक्की. त्यामुळेच किया इंडियाची पहिली वहिली कार किया सेल्टॉसला आल्या आल्याच एवढा प्रतिसाद मिळाला की कंपनीला मागे वळून पहावे लागले नाही. सध्या कंपनीकडे 75 हजार वेटिंग आहे. यामध्ये कियाची आणखी एक सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही आहे. आता किया याच सेल्टॉसची फेसलिफ्ट आणणार आहे.
कियाने सेल्टॉस 2019 मध्ये पहिल्यांदा लाँच केली होती. यावेळी ऑटो मोबाईल सेक्टर मंदीतून जात होते. त्यानंतर कोरोनाची लाट आली. तरीही कंपनीच्या या कारला मोठी मागणी होती. आता कंपनी या सेल्टॉसला मिड लाईफ अपग्रेड करणार आहे. ही कार पुढील वर्षी कधीही लाँच केली जाऊ शकते. या कारचे टेस्टिंग करताना काही फोटो प्रसिद्ध झाले आहेत. दक्षिण कोरियामध्ये सेल्टॉसच्या फेसलिफ्टचे मॉडेल टेस्टिंग सुरु आहे.
फोटोमध्ये कॅमोफ्लेज कार आहे. फक्त विंडस्क्रीन आणि खिडक्या झाकलेल्या नाहीत. हेडलाईट आणि ब्रेकलाईट तेवढ्या उघड्या आहेत. सेल्टॉस भारतात कोरियाई कंपनीची सर्वाधिक विक्रीची कार बनलेली आहे. कियाने या कारची 11 महिन्यांत 48315 युनिट विकल्या आहेत. तर 2020 मध्ये 96932 युनिट विकल्या आहेत.
स्पाय शॉट्समध्ये दिसणारे मॉडेल स्पोर्ट फीचर्समध्ये दिसते. नवीन सेल्टॉसची जाळी अपग्रेड केली जाण्याची शक्यता आहे, परंतु ते पारंपारिक टायगर नोझ वैशिष्ट्य टिकवून ठेवू शकते. एलईडी हेडलाइट युनिटमध्ये काही बदल केलेले दिसत आहेत. भारतात अलीकडेच सादर केलेल्या तीन-सीटर SUV Carens मध्ये पाहिलेल्या हेडलाइट युनिटसारखे असू शकते. नवीन टेललाइट्ससह एसयूव्हीच्या मागील बाजूस असेच बदल अपेक्षित आहेत.