Kia India कंपनीनं आता आपल्या व्हेइकल लाइनअपमध्ये आणखी एक नवी कार सामील करण्याची तयारी केली आहे. कंपनी लवकरच बाजारात आपल्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या Kia Seltos चं फेसलिफ्ट मॉडल सादर करणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनी येत्या ऑटो एक्स्पोमध्ये (2023 Auto Expo) आपली नवी ७-सीटर एसयूव्ही Kia Sorento सादर करण्याच्या तयारीत आहे. Sorento एक थ्री रो कार असणार असून सध्या या एसयूव्हीचं फोर्थ जनरेशन ग्लोबल मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन क्षमतेसह ही नवी एसयूव्ही ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली जाऊ शकते. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत या कारबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
किया इंडियानं अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सध्या ही कार फक्त ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात येईल. ही एसयूव्ही भारतीय ग्राहकांसमोर पहिल्यांदात सादर केली जातेय अशीही बाब नाही. याआधी २०१८ सालच्या ऑटो एक्स्पोमध्ये याच एसयूव्हीचं थर्ड जनरेशन मॉडल सादर करण्यात आलं होतं.
पेट्रोल-डिझल अशा दोन्ही इंजिन प्रकारात ही एसयूव्ही कार जागतिक बाजारात उपलब्ध आहे. तसंच हायब्रिड व्हेरिअंट देखील उपलब्ध आहे. याशिवाय कारमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेतील सध्याच्या Kia Seltos हून ही कार उजवी ठरते.
Kia Sorento च्या फ्रंटलूकमध्ये कंपनीनं आपलं सिग्नेचर स्टाइल टायगर नोज ग्रिल दिलं आहे. ज्यात थ्री-पॉड LED हेडलँप, टायगर हायलाइन एलईडी डे-टाइम-रनिंग लाइट्स देण्यात आल्या आहेत. कारचं बंपर एकदम दमदार देण्यात आलं आहे.
इंटेरिअर कसं असेल?SUV च्या केबिनला अॅडव्हान्स फिचर्सनं सजवण्यात आलं आहे. यात १०.२५ इंचाची सेंट्रल इन्फोटेन्मेंट सिस्टम, व्हर्टिकल एअर कंडिशन (AC)वेंट्स, पॅनारॉमिक सनरुफ, ३६०-डीग्री कॅमेरा, BOSE चे १२ स्पीकर सिस्टम, अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंस सिस्टम (ADAS) लेवल-२, ऑटोनॉमिक्स ड्रायव्हिंग टेक्नोलॉजी यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.