शहरं
Join us  
Trending Stories
1
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
2
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
3
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
4
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
5
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
7
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
8
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
9
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
10
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
11
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
12
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
13
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
14
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
15
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
16
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
17
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
18
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
19
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
20
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट

वाहनाच्या स्टिअरिंगवरील पकड अधिक घट्ट करण्यासह सहज नियंत्रणासाठी उपयुक्त असलेला नॉब

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 6:32 PM

वाहनाच्या स्टिअरिंग व्हीलवर पकड अधिक घट्टही असावी व स्टिअरिंग व्हील फिरवण्याच्या कामातही सहजता यावी, असे एक शास्त्रीय तत्त्व लक्षात घेऊन तयार झालेला स्टिअरिंग नॉब हे विलक्षण साधन आहे.

वाहनाच्या स्टिअरिंग व्हीलवर पकड अधिक घट्टही असावी व स्टिअरिंग व्हील फिरवण्याच्या कामातही सहजता यावी, असे एक शास्त्रीय तत्त्व लक्षात घेऊन तयार झालेला स्टिअरिंग नॉब हे विलक्षण साधन आहे.चाकाचा शोध लागल्यानंतर अनेक विचारांना चालना मिळाली. मात्र हे चाक केवळ वाहनाला पुढे नेणारे नव्हे तर वाहनाला दिशा देणारे स्टिअरिंग म्हणूनही वापरले जाऊ लागले. ट्रॅक्टर असो, कार असो वा बस-ट्रकसारखी अवजड वाहने असोत. या वाहनांच्या चालकांना वाहनाला दिशा देणाऱ्या स्टिअरिंगला सहजपणे वळवता यावे, यासाठी स्टिअरिंगच्या चाकाला, त्या रिमच्या परिघावरती ड्रायव्हरच्या समोरच्या अंगाला एक असा नॉब वा अशी एक मूठ बसवण्यात आली की त्यामुळे वाहनाला दिशा देताना स्टिअरिंग फिरवावे लागते, ते करताना जोर काहीसा कमी लावावा लागेल वा त्या क्रियेमध्ये हातांवर तितका ताण येणार नाही, स्टिअरिंग फिरवणे सोपे जाईल. सुरुवातीला आजच्यासारखे पॉवर स्टिअरिंग नव्हते, त्या काळातील हा साधासोपा उपाय होता. तो उपाय ड्रायव्हरसाठी मात्र खूप उपयुक्त ठरला. इतकेच नव्हे तर आजही पॉवर स्टिअरिंग असलेल्या हॅचबॅकसारख्या मध्यम वा हलक्या मोटारी असोत वा सेदान, एसयूव्ही असोत त्यांच्या पॉवर स्टिअरिंगसाठीही या स्टिअरिंग नॉबचा वापर अनेकजण करत आहेत. स्टिअरिंग व्हीलच नव्हे तर अन्य फिरवल्या जाणाऱ्या चाकालाही या नॉबने फिरवणे सोपे जाऊ शकते. एक विशिष्ट प्रकारची पकड त्यावर येते. साधे उदाहरण द्यायचे तर कुंभाराच्या फिरत्या चाकालाही हाताने गती देण्यासाठी त्या चाकाला या प्रकारचा नॉब उपयोगात येऊ शकेल. साध्या शास्त्रीय अवलोकनातून तयार केलेला हा स्टिअरिंग नॉब आहे.हाताच्या मुठीच्या आकाराइतका छोटा असणारा हा नॉब स्टिअरिंग व्हीलवर बाहेरच्या बाजूने ड्रायव्हरला स्टिअरिंग नीट पणे फिरवण्यास मदत होईल. स्टिअिरंग व्हिलऐवजी तो नॉह हाताच्या मुठीमध्ये धरला तरीही स्टिअरिंगवर नियंत्रण ठेवता येईल. ते स्टिअरिंग त्यामुळे आपोआप हलणार नाही, अशा प्रकारे स्टिअरिंग व्हीलच्या रिमवर- परिघावर हा नॉब बसवला जातो. आज बाजारामध्ये त्याचे रूप खूप आकर्षक केलेले आहे. मात्र सुरुवातीला युरोप, अमेरिकेमध्ये ट्रॅक्टर वा ट्रकवर तो बसवला जात होता. एका हाताने हा नॉब धरून गीयर टाकण्यासाठीही सहजपणा यावा, अशा प्रकारची स्टिअरिंगवर या नॉबची असणारी पकड व स्टिअरिंग फिरवण्यामध्ये येणारी सहजता विलक्षण आहे. वळणाच्या रस्त्यावर वाहन अनेकदा काही अधिक तीव्रपणे वळवावे लागते त्यावेळीही हा नॉब पकडून वाहन वळवण्यातील सहजता साध्य होऊ शकते. एका हातानेही स्टिअरिंगवर नियंत्रण शक्य होऊ शकते. स्टिअरिंगला पकडून ठेवणारी बाजू व मुठीमध्ये बसून त्या नॉबची मूठही स्वतःभोवती फिरू शकेल ही रचना या नॉबला आहे. साध्या शास्त्रीय पद्धतीने होणारी ही क्रिया किती विलक्षण आहे, त्याचा अंदाज या स्टिअरिंग नॉबने यावा.

टॅग्स :carकार