नवी दिल्ली : देशातील लोकप्रिय कार निर्माता कंपनी महिंद्राने या वर्षाच्या सुरुवातीला XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली होती. कंपनीने आता टॉप-स्पेक EL व्हेरिएंट आठ नवीन फीचर्ससह अपडेट केली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 19.19 लाख रुपये आहे.
महिंद्रा XUV400 ला यांत्रिकरित्या अपरिवर्तित ठेवण्यात आले आहे. यात आता क्रूझ कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), ऑटो डिमिंग रिअर व्ह्यू मिरर, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, एक बूट लॅम्प आणि फॉग लॅम्प यांसारखी आठ नवीन फीचर्स आहेत.
यासोबतच सध्याच्या म्युझिक सिस्टीमसोबत दोन ट्वीटरही जोडण्यात आले आहेत. याशिवाय, महिंद्रा XUV400 मध्ये आधीच 7.0-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सिंगल-पेन इलेक्ट्रिक सनरूफ, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, 6 एअरबॅग्ज, चारही व्हीलवर डिस्क ब्रेक, रिअर व्ह्यू कॅमेरा यांसारखे फिचर्स मिळतात.
याचबरोबर, या इलेक्ट्रिक कार फ्रंट एक्सल-माउंटेड मोटरचा वापर करण्यात आला आहे. जो EL ट्रिममध्ये 39.4 kWh मोटरशी जोडलेला आहे. हे 150 hp आणि 310 Nm पीक टॉर्क जनरेट करते. एमआयडीसीने दावा केलेल्या 456 किमीची रेंज ऑफर करते. तसेच, यामध्ये फन, फास्ट आणि फियरलेस असे तीन ड्रायव्हिंग मोड देखील मिळतात.
किंमत किती?Mahindra XUV400 या कारच्या टॉप-ऑफ-द-लाइन EL ट्रिमची एक्स-शोरूम किंमत आता 19.19 लाख ते 19.39 लाख रुपये आहे. महिंद्रा, या ईव्हीसह, थेट टाटा नेक्सॉनला टक्कर देत आहे, जी सध्या विक्रीच्या बाबतीत आघाडीवर आहे. कंपनी आधीच BE सब-ब्रँड सादर करून आणखी इलेक्ट्रिक कार लाँच करण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये BE.05, BE.07 आणि BE.09 EV चा समावेश असेल.