नवी दिल्ली : भारतातील आघाडीची कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी (Maruti Suzuki) ही हॅचबॅक सेगमेंटमधील सर्वोत्तम कार ऑफर करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या हॅचबॅक कारही जास्त लोकप्रिय आहेत. जून 2022 पर्यंत, मारुती सुझुकी वॅगन आर नंतर मारुती स्विफ्ट ही दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार आहे, जी मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारच्या यादीत समाविष्ट आहे.
शानदार लूक आणि उत्कृष्ट फीचर्ससह असलेल्या मारुती स्विफ्टच्या (Maruti Swift) जून महिन्यात 16,000 हजारांहून अधिक युनिट्स खरेदी केल्या आहेत. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे. जर तुम्ही हॅचबॅक कार मारुती स्विफ्ट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मारुती स्विफ्टच्या बेस मॉडेलचे सर्व मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटचे मायलेज आणि किंमतीचे डिटेल्स जाणून घ्या.
मारुती स्विफ्टमध्ये 1197cc पेट्रोल इंजिन पाहायला मिळेल, ज्यामध्ये 88.5bhp पॉवर जनरेट करण्याची क्षमता आहे. तुम्हाला ही हॅचबॅक कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या पर्यायामध्ये देखील पाहायला मिळेल. तसेच, तुम्हाला मारुती स्विफ्ट या सेगमेंटमध्ये 23.76 kmpl पर्यंत शानदार मायलेज देखील पाहायला मिळेल. तुम्हाला 5 सीटर मारुती स्विफ्ट कार LXi, VXi, ZXi आणि ZXi+ सारख्या 4 ट्रिम लेव्हलच्या 9 व्हेरिएंट्समध्ये पाहायला मिळेल. 5.92 लाख रुपयांपासून ते 8.85 लाख रुपयांपर्यंतची ही कार आकर्षक लूक आणि उत्कृष्ट फीचर्ससह सुसज्ज आहे.
मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंटसह मारुती स्विफ्ट VXI ची किंमत तुम्हाला 6.82 लाख रुपये आणि 23.2 kmpl पर्यंत मायलेज मिळते. यामध्ये बेस मॉडेल, मारुती स्विफ्ट LXI चे मॅन्युअल पेट्रोल व्हेरिएंट 5.92 लाख (एक्स-शोरूम) मध्ये उपलब्ध आहे. तसेच, या व्हेरिएंटचे मायलेज 23.2 kmpl पर्यंत आहे. मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटसह मारुती स्विफ्ट ZXI ची किंमत तुम्हाला 7.50 लाख रुपये मिळते आणि ती 23.2 kmpl चा मायलेज देते. याशिवाय, 7.32 लाख रुपयांमध्ये, तुम्हाला Maruti Swif VXI चे AMT व्हेरिएंट मिळेल, जे 23.76 kmpl चे मायलेज देते.
ऑटोमॅटिक व्हेरिएंटमध्ये मिळेल सर्वाधिक मायलेजमारुती स्विफ्टच्या सर्व व्हेरिएंट्स आणि त्यांच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, मारुती स्विफ्ट ZXI प्लसचे डीटी एएमटी व्हेरिएंट 8.85 लाख रुपयांच्या किंमतीसह उपलब्ध आहे आणि 23.76 kmpl पर्यंत मायलेज आहे. तसेच, मारुती स्विफ्ट ZXI प्लसच्या AMT व्हेरिएंटची किंमत 8.71 लाख रुपये आहे, ज्यामध्ये तुम्हाला 23.76 kmpl पर्यंत मायलेज मिळेल. मारुती स्विफ्ट ZXI Plus DT चे मॅन्युअल व्हेरिएंट 8.35 लाख रुपयांच्या किमतीत आणि 23.2 kmpl च्या मायलेजसह उपलब्ध आहे. मारुती स्विफ्टची सर्वाधिक विक्री होणारी कार मारुती स्विफ्ट ZXI प्लसच्या मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत 8.21 लाख रुपये आहे, जी 23.2 kmpl पर्यंत मायलेज देते. ऑटोमॅटिक व्हेरिएंट असलेली मारुती स्विफ्ट ZXI तुम्हाला 8.00 लाख रुपयांपर्यंत आणि 23.76 kmpl पर्यंत मायलेज मिळते. दरम्यान,दिलेल्या सर्व किंमती एक्स-शोरूमच्या आहेत.