बाजारात आज एवढ्या सेकंड हँड कार विकायला आहेत, परंतू अनेकांना त्या कार घेण्याची भीती वाटते. कारण अॅक्सिडेंटल असेल, मीटर मागे घेतलेला असेल, आधीच्या मालकाने सर्व्हिस चांगल्याप्रकारे केलेली नसेल तर तुम्हाला त्याचा फटका बसू शकतो. अनेक डीलर तसे फसवतातही. अनेक ग्राहक सेकंड हँड कार घेतात, त्यांचे बजेट कमी असते, नवख्या चालकाला त्या कारवर हात साफ करायचा असतो किंवा अनेक कारणे असतात.
सेकंड हँड कार घेताना त्याचे फायदे तोटे लक्षात घ्यायला हवेत. फायदा म्हणजे सेकंड हँड कार कमी किंमतीत मिळून जाते. नव्या कारला रजिस्ट्रेशन, रोड टॅक्स, सेस आदी गोष्टी भराव्या लागतात. जुन्या कारला केवळ रजिस्ट्रेशन ट्रान्सफर चार्ज द्यावा लागतो.
जुनी कार असेल तर तिला टक्कर लागली, स्क्रॅच आले याची भीती वाटत राहत नाही. नवीन कार असेल तर कार कुठे लागेल याची चिंता सतावत असते. जर ड्रायव्हिंग शिकायची असेल तर जुनी कार घ्यावी. म्हणजे ही समस्या येणार नाही. जुन्या कारला थोडे जरी घासले तरी ते कमी पैशांत ठीक करता येते किंवा दुर्लक्षित करता येते.
दुसरा एक फायदा म्हणजे अनेकदा लोक सेकंड हँक कार ज्या किंमतीत घेतात त्याच किंमतीत किंवा थोड्या कमी किंमतीत ती विकतात. यामुळे नुकसान होत नाही. चांगली रिसेल व्हॅल्यू मिळून जाते.
जुन्या कारमध्ये काही ना काही समस्या असते. तीचा मेन्टेनन्स थोडा जास्त असतो. जुन्या कारमध्ये त्या काळातील सेफ्टी फिचर मिळतात. कर्ज जास्त व्याजदराने घ्यावे लागते. विकणारे ओडोमीटरमध्ये छेडछाड करतात. जर कार योग्य मेंटेन ठेवलेली नसेल तर ती कमी मायलेज देऊ शकते. नव्या कारवर वॉरंटी असते जुन्या कारवर मिळत नाही. काही कंपन्या देतात.