शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
3
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
4
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
5
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
6
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
7
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
8
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
9
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
10
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
11
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
12
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
13
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
14
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
15
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
16
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
17
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
18
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
19
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
20
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल

Komaki DT 3000 Electric Scooter : सिंगल चार्जमध्ये जाणार 220kms; कोमाकीनं लाँच केली नवी इलेक्ट्रीक स्कूटर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 7:40 PM

Komaki DT 3000 Electric Scooter : पाहा काय आहे विशेष आणि किती असेल किंमत.

Komaki DT 3000 Electric Scooter : इलेक्ट्रीक टू व्हीलर बनवणाऱ्या कोमाकीने शुक्रवारी नवीन इलेक्ट्रीक स्कूटर Komaki DT 3000 ची घोषणा केली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही स्कूटर बाजारात आधीच अस्तित्वात असलेल्या इलेक्ट्रीक स्कूटरला टक्कर देणारी ठरेल. दिल्लीत या ई-स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1,15,000 रुपये इतकी निश्चित करण्यात आहे. शुक्रवारपासून ही स्कूटर सर्वच डीलरशीपमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

कोमाकीने या वर्षीचे आपले तिसरे उत्पादन (कॅलेंडर वर्ष) लाँच केले आहे. यापूर्वी कंपनीच्या रेंजर (Ranger) आणि व्हेनिस (Venice) सारख्या टू व्हीलरला चांगला प्रतिसाद मिळाला होता. इलेक्ट्रिक स्कूटर Komaki DT 3000 मध्ये 3000 वॅट BLDC मोटर देण्यात आली आहे. तसेच या स्कूटरमध्ये 62V52AH ची बॅटरी आहे. एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे DT 3000 सिंगल चार्जवर 180-220 किमी मायलेज देऊ शकते आणि या स्कूटरचा सर्वाधिक वेग 90 किमी प्रति तास इतका आहे.

फोटो जारी केला नाहीकंपनीने अद्याप या ई-स्कूटरचा फोटो जारी केलेला नाही. त्यामुळे, जर तुम्हाला या ई-स्कूटरमध्ये स्वारस्य असेल, तर तुम्ही डीलरशिपवर जाऊन या स्कूटरचा लूक आणि इतर फीचर्स पाहू शकता. “भारतीय ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर, आम्ही पुन्हा DT 3000 हाय-स्पीड स्कूटरच्या माध्यमातून लोकांची मने जिंकण्यासाठी तयार आहोत. DT 3000 ही 3000W BLDC मोटर आणि 62V52AH पेटंट लिथियम बॅटरीसह ऑफर करण्यात आली आहे. यामध्ये 12 हून अधिक मॉडर्न फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत," अशी माहिती कोमाकी इलेक्ट्रीक डिव्हिजनच्या डायरेक्टर गुंजन मल्होत्रा म्हणाल्या.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड