आलिशान कार निर्माता कंपनी लॅम्बोर्गिनीने (Lamborghini) यावर्षी ऑगस्टमध्ये जागतिक बाजारपेठेत आपली Lamborghini Urus Performante आलिशान कार लाँच केली होती. यानंतर आता ही कार भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच केली आहे. लॅम्बोर्गिनीची ही जगातील सर्वात वेगवान SUV कार आहे. या लॅम्बोर्गिनी कारच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत सर्व डिटेल्स जाणून घ्या...
किंमत :Lamborghini Urus Performante या आलिशान कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, या कारची किंमत 4 कोटी 22 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे.
इंजिन :या कारमध्ये कंपनीने 4.0 लीटर ट्विन-टर्बो चार्ज्ड V8 इंजिन दिले आहे, जे 666hp पॉवर आणि 850Nm टॉर्क जनरेट करते.
स्पीड :या कारबद्दल असा दावा करण्यात आला आहे की, ही आलिशान कार केवळ 3.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. इतकेच नाही तर या कारचा टॉप स्पीड 306kmph आहे.
ड्रायव्हिंग मोड्स : लॅम्बोर्गिनीच्या या आलिशान कारला स्पोर्ट, Strada (स्ट्रीट), रॅली आणि Corsa (ट्रॅक) असे चार वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड्स मिळतात.
डिझाइन : या कारचे डिझाइन कंपनीच्या त्याच कारच्या स्टँडर्ड व्हर्जनसारखेच आहे, जरी तुम्हाला या कारमध्ये काही बदल देखील दिसतील जसे की फ्रंट बंपर, कूलिंग व्हेंटसह नवीन बोनेट आणि कार्बन फायबर एलिमेंट्सचा वापर करण्यात आला आहे. या कारचे वजन आधीच्या तुलनेत 47 किलोने कमी झाले आहे.
या कारना देणार टक्कर!लॅम्बोर्गिनी ही कार सुपर Super SUV या किमतीच्या सेगमेंटमध्ये Aston Martin DBX 707, Porsche Cayenne Coupe Turbo GT शिवाय Audi RSQ8 आणि Maserati Levante Trofeo सारख्या इतर आलिशान कारना बाजारपेठेत टक्कर देण्याची शक्यता आहे.
व्हील आणि टायर : या लॅम्बोर्गिनी कारला टायटॅनियम बोल्टसह कार्बन फायबर व्हील देण्यात आले आहे. तसेच कारला 23-इंच आणि 22-इंच लाइटवेट व्हील ऑप्शन दिले आहेत. याशिवाय, या कारमध्ये खास डिझाइन केलेले Pirelli टायर देण्यात आले आहेत.