लँड रोव्हरने भारतीय बाजारात डिफऱेन्डरचे नवे हायफाय मॉडेल लाँच केले आहे. या डिफेन्डरची किंमत 73.98 लाख रुपयांपासून सुरू होत आहे.
या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे तिची जुनी ओळख तशीच ठेवण्यात आली आहे. फ्रण्ट व रिअर ओव्हरहँग्स, अल्पाइन लाइट विंडोज, साइड-हिंज रिअर टेलगेट आणि बाहेरील बाजूस माऊंट केलेले स्पेअर व्हील जुन्या मॉडेलसारखेच ठेवण्यात आले आहे. डिफेण्डरमध्ये पहिल्यांदाच नवीन 'पीव्ही प्रो' इन्फोटेन्मेंट सिस्टम, ज्यामध्ये आकर्षक इंटरफेससह २५.४ सेमी (१० इंच) टचस्क्रिन आणि दर्जात्मक तंत्रज्ञान, जसे क्लीअर साइट रिअर अॅण्ड ग्राऊण्ड व्ह्यू, ३डी सराऊंड कॅमेरा या सुविधा देते. याचसोबत चार अॅक्सेसरी पॅक एक्सप्लोरर, अॅडवेन्चर, कंट्री व अर्बन देण्यात येत आहेत.
नव्या डिफेन्डरमध्ये २२१ केडब्ल्यू (३०० पीएस) शक्ती व ४०० एनएम टॉर्कची निर्मिती करणारे २.० लिटर टर्बोचार्ज फोर-सिलिंडर पेट्रोल इंजिन असणार आहे. स्पोर्टी ९० (३ दरवाजे) आणि वैविध्यपूर्ण ११० (५ दरवाजे) अशी दोन मॉडेल आहेत. डिफेन्डर 90 ची किंमत 73.98 लाखांपासून सुरु होते तर डिफेन्डर 110 ची किंमत 79.94 लाखांपासून सुरु होते. ९ व्हील डिझाइन्सच्या रेंजसह ४५.७२ सेमी (१८ इंच) प्रेस्ड स्टील रिम्स ते ५०.८ सेमी (२० इंच) अलॉइज देखील आहेत.
फुजी व्हाइट, एगर ग्रे, सॅन्टोरिनी ब्लॅक, इंडस सिल्व्हर, टेस्म्न ब्ल्यू, पॅनगिआ ग्रीन व गोंडवना स्टोन अशा सात रंगांत ती उपलब्ध आहे. सीट फोल्ड केल्यास 2380 लीटर स्पेस मिळते. तर सीट फोल्ड न केल्यास 231 लीटर स्पेस मिळते.
लँड रोव्हरकडे असलेली रेंजलँड रोव्हरच्या भारतातील रेंजमध्ये रेंज रोव्हर इवोक (Range Rover Evoque) (किंमत ५८.६७ लाख रुपयांपासून), डिस्कव्हरी स्पोर्ट (Discovery Sport) (किंमत ५९.९१ लाख रुपयांपासून), रेंज रोव्हर वेलार (Range Rover Velar) (किंमत ७३.३० लाख रुपयांपासून), डिस्कव्हरी (Discovery) (किंमत ७५.५९ लाख रूपयांपासून), रेंज रोव्हर स्पोर्ट (Range Rover Sport) (किंमत ८८.२४ लाख रुपयांपासून) आणि रेंज रोव्हर (Range Rover) (किंमत १९६.८२ लाख रुपयांपासून) या कार्सचा समावेश आहे. या सर्व किमती भारतातील एक्स-शोरूम किमती आहेत.