हार्ले डेव्हिडसन ची बाईक ही अनेक तरुणांचे स्वप्न असते. महाग पण एक आगळी जोमदार,तडफदार अशी ही मोटारसायकल हे तरुणांचे आकर्षण, हार्ले डेव्हिडसनच्या ११५ व्या वर्धापनवर्षानिमित्त त्यांनी २०१८च्या मालिकेतील तीन बाइक्स भारतात १२ ऑक्टोबरला सादर करण्य़ाचे ठरवले आहे. तसे पाहायला गेले तर हार्ले डेव्हिडसन इंडियाने जगभरातील तरुणाईच्या मानल्या गेलेल्या मोटारबाइक्सचे सादरीकरण या आधीच केले आहे. पण आता याच महिन्यात या नव्या तीन बाइक ऑक्टोबर हीट ठरणार आहेत. स्ट्रीट बॉब, फॅट बॉब व फॅट बॉय या तीन दमदार मोटारसायकल सादर होणार आहेत. २०१८मधील मालिकेतील या मोटारसायकलींपैकी या तीन मोटारसायकली काही छोट्या बदलांद्वारे भारतात सादर होत आहे. काही मॉडेल्समध्ये मात्र महत्त्वाचे बदलही केले जाणार आहेत. ते या तीन मॉडेल्समध्ये आहेत की, पुढील वर्षी सादर होणाऱ्या मॉडेलमध्ये असतील ते पाहायचे आहे.या वर्धापनवर्षामध्ये एकंदर ८ मोटारसायकली हार्ले डेव्हिडसन सादर करणार असून
स्ट्रीट बॉब, फॅट बॉब व फॅट बॉय मधील वैशिष्ट्ये
हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट बॉब - यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये बदल असून तो हॅण्डलबारमध्ये केला गेला आहे. पूर्वी इंधन टाकीवर असणारे हे युनिट क्लस्टर आता दुसऱ्या जागी येत आहे. नवीन मफलर आरेखन व रंगातील एक खास राकटपणा या मोटारसायकलीचे वैशिष्ट्य असणार आहे.
हार्ले डेव्हिडसन फॅट बॉब - फॅट या शब्दात एक जाडेपणा असला तरी या मोटारसायकलीत केवळ जाडेपणा नाही तर आक्रमकता असणारे आरेखन आहे. तसा एक रांगडा लूक त्याला दिला गेला आहे. हेडलॅम्पचे लंबवर्तुळाकार रूप होते. ते आता अिधक वेगळ्या रितीने बसवण्यात आले आहे. मफलरही नव्या लूकचा आहे.
हार्ले डेव्हिडसन फॅट बॉय - अमेरिकी भाषेत 'स्टीमरोलर'चा पवित्रा असणारी ही मोटरसायकल फॅन्सी रिम दिलेली असून सॉफ्टेल फ्रेम अधिक हलकी पण कणखर करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
हार्ले डेव्हिडसन ११५ व्या वर्षात सादर होणाऱ्या आठवही मोटारसायकलींना स्वतंत्र असे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांची स्वतःची अशी विविध वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा प्रत्येकाचा एक लूक वा attitude आहे.
हार्ले डेव्हिडसनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मॅथ्यू एस. लेव्हातिच म्हणतात संपूर्ण नव्या पिढीला प्रोत्साहीत करणारी ही आठ मॉडेल्स आहेत.
फॅट बॉय, हेरिटेज क्लासीक, लोअर रायडर, सॉफ्टेल स्लीम, डिलक्स, ब्रेकआऊट, फॅट बॉब व स्ट्रीट बॉब अशा आठ नावांच्या व्यक्तिमत्त्वाच्या हा मोटारसायकली असतील.
२९६ किलोग्रॅम वजन, शक्तीमान असे १७४५ सीसीचे मिलवाऊकी-एट -१०७ असे मोठे ट्वीन इंजिन,