शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

भारतात येतीये ही ब्रिटीश स्पोर्ट्स कार कंपनी, 9 नोव्हेंबर लॉन्च होणार पहिली सुपरकार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 5:49 PM

Lotus: मॅक्लारेननंतर आणखी एक ब्रिटीश स्पोर्ट्स कार कंपनी भारतात दाखल होत आहे.

Lotus To Enter India: भारताच्या ऑटोमोबाईल क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळेच जगभरातील अनेक कंपन्या भारतात आपलाय व्यवसाय सुरू करताहेत. मॅक्लारेननंतर आणखी एक ब्रिटीश स्पोर्ट्स कार कंपनी भारतात दाखल होणार आहे. जागतिक स्तरावर एमेया(Emeya), इलेट्रे(Eletre), एमिरा(Emira) आणि इविजा(Evija) सारख्या स्पोर्ट्स कार बनवारी कंपनी 'लोटस' भारतात दाखल होणार आहे.

कंपनीने 9 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची पुष्टी केली आहे. लोटसने भारतातील डीलर आणि सर्व्हिस पार्टनर म्हणून नवी दिल्लीस्थित एक्सक्लुझिव्ह मोटर्सशी हातमिळवणी केली आहे. एक्सक्लुझिव्ह मोटर्स भारतातील बेंटले मोटर्सची विक्री करते. लोटस सुरुवातीला 1 मॉडेल लॉन्च करू शकते, त्यानंतर ग्राहकांच्या प्रतिसादावर उर्वरित मॉडेल्स लॉन्च करण्याचा विचार करेल.

लोटसने भारतात लॉन्च होणाऱ्या मॉडेलचे नाव अद्याप उघड केले नसले तरी, सुपरकार ब्रँड पेट्रोलवर चालणारी एमिरा स्पोर्ट्सकार किंवा ऑल-इलेक्ट्रिक एलेट्रे एसयूव्ही लॉन्च करण्याची अपेक्षा आहे. त्‍याच्‍या गाड्या भारतात कम्‍लीटली बिल्‍ट युनिट (CBU) म्‍हणून येतील.

कशी आहे लोटस एमिरालोटस एमिया ही टू-डोअर स्पोर्ट्स कार आहे, जी 2021 मध्ये जागतिक बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली होती. ही दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. पहिले इंजिन 3.5-लिटर सुपरचार्ज V6 पेट्रोल इंजिन आहे, जे 400 हॉर्सपॉवर जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल किंवा 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. ही सुपरकार 4.4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते.

दुसरी कार 2.0-लिटर 4-सिलेंडर टर्बो-पेट्रोल युनिट आहे, जी 362 हॉर्स पॉवर आणि 430 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 8-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह येते. ही कार 4.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते. या कारचा टॉप स्पीड ताशी 296 किमी आहे. एमियाची किंमत सुमारे 2.50-2.70 कोटी रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे.

लोटस इलेट्रेLotus Electre ब्रँडची पहिली ऑल-इलेक्ट्रिक SUV आहे. ही इलेक्ट्रिक प्रीमियम आर्किटेक्चरवर आधारित आहे आणि त्यात ड्युअल-मोटर सेटअप आहे. ही 600 पेक्षा जास्त हॉर्स पॉवर जनरेट करते. लोटसचा दावा आहे की, इलेट्रा 3 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. कारचा टॉप स्पीड ताशी 260 किमी आहे. या कारची किंमत 2.5-3.0 कोटी रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.

टॅग्स :carकारAutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कारInternationalआंतरराष्ट्रीय