मुंबई : टाटा मोटर्स या भारतातील सर्वांत मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने मॅजिक एक्स्प्रेस ही रुग्णांची वाहतूक करणारी अँम्बुलन्स आणली आहे. इकोनॉमी अँम्बुलन्स विभागातील आरोग्यसेवा वाहतुकीसाठी ही अँम्बुलन्स खास डिझाइन करण्यात आली आहे. मॅजिक एक्स्प्रेस अँम्बुलन्स ही वैद्यकीय व आरोग्याशी संबंधित सेवांना सहाय्य करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
कोरोना साथीच्या काळात या सेवांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या वाहनाच्या आटोपशीर आकारमानामुळे भारतीय रस्त्यांवर ते हलवणे खूपच सुलभ आहे, परिणामी आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णांना वेगाने हलवण्यासाठी ती उपयुक्त आहे. पर्यायाने ती प्राण वाचवणारी अँम्बुलन्स ठरणार आहे. रुग्ण आणि सहाय्यकांना पुरेशी जागा, सुरक्षितता व आराम पुरवण्याच्या दृष्टीने हे वाहन एर्गोनॉमिक पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहे आणि एआयएस १२५ नियमांचेही पूर्णपणे पालन करणारे आहे. यात मूलभूत जीवनरक्षक, प्रगत जीवनरक्षक आणि मल्टि-स्ट्रेचर ४१०/२९ अँब्युलन्सचा समावेश आहे.
मॅजिक एक्स्प्रेस अँब्युलन्स ही ऑटो-लोडिंग स्ट्रेचर, मेडिकल कॅबिनेट, ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था, डॉक्टरांसाठी आसन व अग्निशमन व्यवस्थेसारख्या अत्यावश्यक उपकरणांनी सुसज्ज आहे. शिवाय अंतर्गत प्रकाशयोजना, आगप्रतिबंधक अंतर्गत रचना आणि उद्घोषणेची व्यवस्थाही या रुग्णवाहिकेत आहे. ही रुग्णवाहिका एआयएस प्रमाणित रेट्रो रिफ्लेक्टिव डेकल्स आणि सायरनसह बेकन लाइटने सुसज्ज आहे. चालकाचा आणि रुग्णाचा भाग पार्टिशन घालून वेगळा करण्यात आला आहे. यामुळे सुरक्षितता पक्की होते. विशेषत: कोरोना रुग्णांची वाहतूक करण्यासाठी हे अत्यावश्यक आहे. रुग्णवाहिकेला सर्वोत्तम दर्जाच्या ८०० सीसी टीसीआयसी इंजिनचे बळ आहे. हे इंजिन ४४ हॉर्सपॉवर ऊर्जा व ११० एनएम टॉर्क निर्माण करते. याशिवाय, दमदार बांधणीमुळे रुग्णवाहिकेची किमान देखभाल पुरेशी ठरते. म्हणजेच हे वाहन उत्तम कामगिरी करते पण ते बाळगण्याचा खर्च कमी आहे. अर्थातच हे कोणताही त्रास न देणारे वाहन आहे.