मुंबई - महिंद्रा लवकरच आपली एक मिनी इलेक्ट्रिक कार महिंद्रा अॅटम बाजारात आणणार आहे. कंपनीने ही कार दोन वर्षांपूर्वी ऑटो एक्स्पोमध्ये सादर केली होती. ही कार २०२०मध्ये लॉन्च होणार होती, मात्र कोरोनामुळे तिचे लाँचिंग लांबणीवर पडले होते. लाँचिंगनंतर ही भारतातील पहिली क्वाड्रिसायकल असेल. रिपोर्टनुसार, हल्लीच या इलेक्ट्रिक कारला अॅप्रुव्हल सर्टिफिकेट मिळालं आहे. जुन्या सर्टिफिकेटमध्ये या कारला नॉन ट्रान्सपोर्टच्या गटात ठेवण्यात आले होते. मात्र आता तिला ट्रान्सपोर्टच्या गटात ठेवण्यात आले आहे.
महिंद्रा अॅटम एकूण चार व्हेरिएंट के१, के२, के३ आणि के४ मध्ये उपलब्ध होणार आहे. त्याच्या के१ आणि के२ व्हेरिएंटमध्ये ७.४kWh, १४४Ah बॅटरी पॅक असेल. तर अॅटम के३ मध्ये ११.१ kWh, 216Ah बॅटरी पॅक मिळळण्याची शक्यता आहे. जिथे के१ आणि के२ साठी फुल चार्जिंग रेंज ही सुमारे ८० किमी असेल. तर के३ आणि के४ साठी ही रेंज १०० किमी राहण्याची शक्यता आहे.
फिचर्सचा विचार केला तर के१ आणि के३ एअर कंडीशनिंगसह येणार नाहीत. मात्र नॉन एसी व्हेरिएंट फूल चार्ज केल्यावर अधिक अंतर कापू शकतील. डिझाइनचा विचार केल्यास यामध्ये युनिक ग्रिल मोठे हेडलॅम्प्ससह खूप मोठी विंड स्क्रिन दिली जाईल. याची फ्रंट विंडोही मोठी असेल. ही काह खूप कॅम्पॅक्ट दिसून येते. या कारचा वापर कमर्शियल वापरासाठी करता येईल.
महिंद्रा अॅटमला सुमारे तीन लाख रुपयांच्या प्राथमिक किमतीवर लॉन्च केलं जाईल. लाँचच्या वेळी या कारला कुणी थेट प्रतिस्पर्धी असण्याची शक्यता नाही, भविष्यात मात्र बजाज क्यूट इलेक्ट्रिकसोबत तिची स्पर्धा होणार आहे.