गेल्या काही महिन्यांत कारच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. नवीन कार खरेदी करणाऱ्यांमध्ये SUV खरेदी करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. भारतीय बाजारपेठेत एक मोठा ट्रेंड दिसून येत आहे. तर ग्राहक छोट्या कारऐवजी मोठ्या प्रमाणात एसयूव्ही कार खरेदी करत आहेत. आता महिंद्रा कंपनीनं SUV कारसाठी मोठ्या सवलतीची घोषणा केली आहे.
महिंद्राने ऑगस्ट 2022 साठी बंपर ऑफर आणल्या आहेत. महिंद्राची नवीन SUV कार खरेदी केल्यास ४०,००० रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट मिळत आहे. महिंद्रा XUV300, Marazzo, KUV100 NXT आणि बोलेरोच्या खरेदीवर प्रचंड सवलत देत आहे. नवीन SUV खरेदीवर तुम्हाला किती सूट मिळेल ते पाहूया.
महिंद्रा बोलेरो- २० हजार रुपये बोलेरो ही कार महिंद्राच्या लाइनअपमधील सर्वात जुनी आहे. ७ सीटर बोलेरो कारला मार्च २०२० मध्ये शेवटचं अपडेट करण्यात आलं होतं. ही SUV कार 1.5 लिटर mHawk75 डिझेल इंजिन आणि 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. बोलेरो खरेदी केल्यावर तुम्हाला 10,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज मिळतील. अशा प्रकारे बोलेरो खरेदी करून तुम्ही 20,000 रुपये वाचवू शकता.
महिंद्रा KUV100 NXT- २५ हजार रुपयेMahindra KUV100 NXT ही कंपनीची सर्वात छोटी SUV कार आहे. ही कार एसयूव्हीपेक्षा हॅचबॅकसारखी आहे. KUV100 NXT ही सहा सीटर कार आहे. सेगमेंट आणि किमतीसाठी नक्कीच चांगला पर्याय आहे. महिंद्राने या SUV वर 25,000 रुपयांची सूट दिली आहे. यामध्ये 15,000 रुपयांची रोख सूट आणि 10,000 रुपयांच्या अॅक्सेसरीजचा समावेश आहे.
महिंद्रा Marazzo- २५ हजार रुपयेमहिंद्रा मराझो इंटिरिअर स्पेससाठी ओळखली जाते. ही SUV 6 आणि 7 सीटर पर्यायांसह येते. Marazzo खरेदीवर तुम्हाला 25,000 रुपयांची सूट मिळेल. ही कार 1.5 लीटर डिझेल इंजिनसह येते, जी 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेली आहे. तुम्ही ही SUV कार खरेदी केल्यास, महिंद्र तुम्हाला निवडक व्हेरियंटवर रु. 25,000 ची रोख सूट देईल.
महिंद्रा XUV300- ४० हजार रुपयेमहिंद्रानं ऑगस्ट २०२२ साठी सर्वात जास्त डिस्काऊंट XUV300 वर दिला आहे. महिंद्रा एसयूव्ही XUV300 वर कंपनीनं ४० हजार रुपयांचा डिस्काऊंट दिला आहे. जर तुम्ही SUV कार घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा विचार करत असाल तर एक्सयूव्ही ३०० कार घेऊन तुम्ही ४० हजारांची बजत करू शकता. सवलतीच्या ऑफरमध्ये 10,000 रुपयांच्या अॅक्सेसरीज आणि 30,000 रुपयांच्या रोख सूट ऑफरचा समावेश आहे.