Mahindra EV: भारतातील आघाडीची कार उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा 15 ऑगस्टला जागतिक बाजारपेठेत मोठा धमाका करणार आहे. पुढच्या महिन्यात लंडनमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात महिंद्रा आपल्या 5 नवीन इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या कॉन्सेप्ट मॉडेलचे अनावरण करेल. याशिवाय, कंपनी लवकरच एक इलेक्ट्रिक पिकअप ट्रकदेखील बाजारात आणणार असल्याची माहिती आहे.
महिंद्राची इलेक्ट्रीक ट्रक येणारमीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्राची अपकमिंग इलेक्ट्रिक लाइफस्टाइल पिकअप ट्रकला युनायटेड किंगडममधील महिंद्रा अॅडव्हांस्ड डिझाइन यूरोप (MADE) मध्ये तयार केले जात आहे. ही ट्रक सध्या नॉर्थ अमेरिकन मार्केटसाठी बनवली जात आहे. महिंद्रा नॉर्थ अमेरिकन टेक्निकल सेंटरमध्ये या पिअकप ट्रकचे मेकॅनिकल पार्ट तयार करणार आहे. विशेष म्हणजे, महिंद्रा फॉक्सवॅगन ग्रुपसोबत ही गाडी तयार करेल. नुकतीच या दोन्ही कंपन्यांची पार्टनरशिप झाली आहे.
डिसेंबरपर्यंत बाजारात येणारमहिंद्राच्या नवीन एसयूव्ही कारमध्ये XUV400 देखील सामील आहे. या गाडीला कंपनी या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत बाजारात आणण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्राच्या अपकमिंग इलेक्ट्रिक कारमध्ये एलजी आणि चायनीज कंपनीच्या बॅटरी बसवण्यात येतील. याशइवाय, महिंद्रा एका नवीन Coupe SUV ला शोकेस करेल. ही Mahindra XUV900 Electric SUV Coupe असू शकते.
महिंद्रासमोर तगडे स्पर्धकसध्या भारतासह अनेक देशात इलेक्ट्रीक गाड्यांचे मार्केट झपाट्याने वाढत आहे. या सेगटमेंटमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी महिंद्रा मोठी पाउले उचलत आहे. याच अंतर्गत महिंद्रा विविध प्रकारच्या गाड्या लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. भारतात महिंद्राच्या इलेक्ट्रीक गाड्यांचा थेट सामना टाटा नेक्सॉन ईव्ही, नेक्सॉन ईव्ही मॅक्स आणि एमजी जेडएस ईव्हीसारख्या लोकप्रिय गाड्यांसोबत असेल.