शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
2
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
3
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
4
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
5
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
6
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
7
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
8
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
9
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
10
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
11
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
13
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
14
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
15
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
16
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
17
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
18
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
19
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
20
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात

Mahindra लवकरच भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार, जाणून घ्या किती असेल किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 10:47 AM

Mahindra Atom EV  : इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंटमध्ये महिंद्राचा बाजारातील हिस्सा 73.4 टक्के आहे, ज्यामुळे कंपनी या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढताना दिसून येत आहे. आता कंपन्यांसह ग्राहकांनीही या वाहनांमध्ये रस घेण्यास सुरुवात केली आहे. मोठ्या वाहन निर्मात्यांबरोबरच, लहान आणि मोठे स्टार्टअप देखील आता इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणत आहेत. महिंद्रा इलेक्ट्रिकने ट्रेओ ऑटो, ट्रेओ जोर डिलिव्हरी व्हॅन, ट्रेओ टिपर व्हेरिएंट आणि ई-अल्फा मिनी टिपरसह अॅटम क्वाड्रिसायकल सादर केली आहे. इलेक्ट्रिक 3-व्हीलर सेगमेंटमध्ये महिंद्राचा बाजारातील हिस्सा 73.4 टक्के आहे, ज्यामुळे कंपनी या यादीत पहिल्या स्थानावर आहे.

महिंद्रा अॅटमला चार व्हेरिएंट्स K1, K2, K3 आणि K4 मध्ये लॉन्च केले जाईल. याचे पहिले दोन व्हेरिएंट्स 7.4 kWh बॅटरी पॅकसह येतील, तर इतर दोन शक्तिशाली 11.1 kWh बॅटरी पॅकसह येतील. अॅटमचे K1 आणि K3 बेस व्हेरिएंट एअर कंडिशनिंग सिस्टमसह येत नाहीत, तर K2 आणि K4 मध्ये हे फीचर आहे. असा अंदाज आहे की, कंपनी लवकरच अॅटम क्वाड्रिसायकल भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे.

इलेक्ट्रिक पॉवरवर चालणारे महिंद्रा अॅटम आरामदायी आणि स्मार्ट फीचर्ससह स्वच्छ ऊर्जेने सुसज्ज आहे. अॅटमसोबत महिंद्राने इलेक्ट्रिक अल्फा टिपर देखील बाजारात आणले आहे, जे ई-अल्फा मिनी प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ई-अल्फा मिनी टिपर 1.5 kWh बॅटरी पॅकद्वारे दिले आहे, जे एका चार्जवर 80 किमी पर्यंत रेंज देते. त्याची लोडिंग क्षमता 310 किलो आहे. सध्या महिंद्रा अॅटम हे व्यावसायिक वाहन म्हणून लॉन्च करण्यात आले आहे, जे वैयक्तिक वापरासाठी लॉन्च केले जाईल की नाही हे अद्याप माहित नाही.

फक्त 3 लाख असेल किंमत!महिंद्र अ‍ॅटम ही केवळ लूक आणि फीचर्समध्ये पैशाची कार आहे असे नाही तर तिची किंमतही खूपच कमी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आतापासून असा अंदाज बांधणे योग्य ठरणार नाही, परंतु या कारची किंमत सुमारे 3 लाख रुपये असेल असा अंदाज आहे. महिंद्रा अॅटमचा कमाल वेग 50 किमी/तास असेल आणि तो पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 5 तास लागतील. अॅटम इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल एका चार्जवर 120 किमी पर्यंत चालवता येते. दरम्यान, इलेक्ट्रिक ऑटो-रिक्षासाठी हा एक उत्तम पर्याय म्हणून उदयास आला आहे.

टॅग्स :AutomobileवाहनMahindraमहिंद्रा