शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

महिंद्राने आणखी एक नवीन Scorpio केली लॉन्च; फीचर्ससह मिळतील अपडेटेड सस्पेंशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 7:31 PM

Mahindra Scorpio Classic Unveiled : नवीन स्कॉर्पिओ क्लासिकचे डिझाईन अपडेट करण्यात आले आहे. तसेच इंटिरिअरमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत. यात नवीन फीचर्स आणि अपडेटेड सस्पेंशन देखील मिळेल.

नवी दिल्ली : महिंद्राने देशात नवीन स्कॉर्पिओ एनसोबत जुन्या स्कॉर्पिओची विक्री सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. मात्र, जुन्या मॉडेलची जागा नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकने (Mahindra Scorpio Classic) घेतली आहे. महिंद्राने नवीन स्कॉर्पिओ क्लासिक लाँच केली आहे. नवीन स्कॉर्पिओ क्लासिकचे डिझाईन अपडेट करण्यात आले आहे. तसेच इंटिरिअरमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत. यात नवीन फीचर्स आणि अपडेटेड सस्पेंशन देखील मिळेल.

नवीन महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक दोन ट्रिम्स-क्लासिक एस आणि क्लासिक एस 11 मध्ये ऑफर केली आहे. दोन्ही ट्रिम्स 7 आणि 9-सीट ऑप्शनमध्ये ऑफर केल्या आहेत. नवीन स्कॉर्पिओ क्लासिकला नवीन ग्रिल डिझाइन, फॉक्स स्किड प्लेट आणि महिंद्राचा नवीन 'ट्विन पीक्स' लोगो देण्यात आला आहे. टॉप-स्पेक क्लासिक एस 11 मध्ये 17-इंच ड्युअल-टोन अलॉय मिळतील तर क्लासिक एसला स्टील व्हील मिळतील.

नवीन स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल. यात सेंटर कन्सोलमध्ये डार्क वुडन ट्रिम इन्सर्ट आणि डॅशबोर्डवर पियानो ब्लॅक इन्सर्ट देण्यात आला आहे.  याचा गियर लीव्हर नवीन थारमधून घेण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने, नवीन स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, पॅनिक ब्रेक इंडिकेशन, इंजिन इमोबिलायझर, अँटी थेफ्ट वॉर्निंग, सीट बेल्ट रिमाइंडर लॅम्प, स्पीड अलर्ट आणि ड्रायव्हिंग करताना ऑटो डोअर लॉक यांसारखी फीचर्स देण्यात आली आहेत.

इंजिन आणि सस्पेंशन नवीन महिंद्र स्कॉर्पिओ क्लासिकमध्ये 2.2-लिटर 4-सिलिंडर mHawk टर्बो डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 3,750rpm वर 130bhp पॉवर आणि 1600-2800rpm वर 300Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. सस्पेंशनबद्दल बोलायचे झाले तर समोर डबल विश-बोन टाईप, इंडिपेंडंट फ्रंट कॉइल स्प्रिंग आणि मागील बाजूस अँटी-रोल बारसह मल्टी-लिंक कॉइल स्प्रिंग देण्यात आले आहे.

टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग