Mahindra Scorpio:महिंद्राने 2022 मध्ये भारतीय बाजारपेठेत Scorpio N आणि Scorpio Classic लॉन्च केली. या दोन्ही नवीन मॉडेल्सना भारतीय बाजारपेठेत चांगलीच पसंती मिळत आहे. बाजारात या गाड्यांची मागणी एवढी जास्त आहे की, या गाड्यांसाठी प्रतीक्षा कालावधी 20 महिन्यांपर्यंत पोहोचला आहे. नवीन Scorpio twins ने XUV700, Hector, Harrier, Safari आणि Alcazar यासह मिड साइड सेगमेंटमधील SUV ला मागे टाकले आहे.
महिंद्राने मार्च 2023 मध्ये स्कॉर्पिओ एन आणि स्कॉर्पिओ क्लासिकच्या एकूण 8,788 युनिट्सची विक्री केली होती, जी गेल्या वर्षी याच महिन्यात झालेल्या 6,061 युनिट्सपेक्षा जास्त आहे. स्कॉर्पिओने वार्षिक विक्रीत 44.99 टक्के आणि महिन्या-दर-महिना विक्रीत 26.45 टक्के वाढ नोंदवली आहे.
महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकमहिंद्रा XUV700 मार्च 2023 मध्ये 5,107 युनिट्सच्या विक्रीसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. याने 15.45 टक्के वार्षिक विक्री वाढ नोंदवली. एमजी मोटर इंडियाने मार्च 2023 मध्ये हेक्टर आणि हेक्टर प्लसच्या 4,105 युनिट्सची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात 2,019 युनिट्सची विक्री झाली होती. टाटा मोटर्सने मार्च 2023 मध्ये हॅरियरच्या 2,561 युनिट्स आणि सफारीच्या 1,890 युनिट्सची विक्री केली. Hyundai Alcazar ने गेल्या महिन्यात एकूण 2,519 युनिट्सची विक्री नोंदवली.
Scorpio चे इंजिन Mahindra Scorpio N दोन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. 2.0-लीटर टर्बो पेट्रोल आणि 2.2-लीटर टर्बो डिझेल. डिझेल इंजिन दोन प्रकारचे ट्यून देते - 132bhp/300Nm आणि 175bhp आणि 370Nm (MT)/400Nm (AT). पेट्रोल इंजिन 203bhp आणि 370Nm (MT) / 380Nm (AT) टॉर्क निर्माण करते. ट्रान्समिशन पर्यायांमध्ये 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे.