शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

Mahindra Scorpio-N Booking : उद्यापासून महिंद्रा स्कॉर्पिओ-एनचे बुकिंग सुरू होणार; फक्त 21000 रुपयांमध्ये करा बुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 5:32 PM

Mahindra Scorpio-N Booking :  या कारची  बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि महिंद्रा डीलरशिपवर सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल.

नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्रा उद्यापासून (30 जुलै 2022) नव्याने लॉन्च झालेल्या Scorpio-N SUV साठी बुकिंग सुरू करणार आहे.  या कारची  बुकिंग कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि महिंद्रा डीलरशिपवर सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होईल. तसेच, ही कार अवघ्या 21 हजार रुपयांमध्ये बुक करता येणार आहे. मात्र, डिलिव्हरी 26 सप्टेंबरपासून होईल. 

कार निर्मात्या कंपनीने आपल्या सर्व पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटच्या किंमती आधीच उघड केल्या आहेत, ज्या 11.99 लाख ते 23.90 लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. कारचा सर्वात स्वस्त व्हेरिएंट Z2 (पेट्रोल, मॅन्युअल ट्रान्समिशन) आहे, याची किंमत 11.99 लाख रुपये आहे. महिंद्राने शेअर केलेल्या माहितीनुसार, Scorpio-N ही फायनान्स स्कीम FinN* अंतर्गत 10 वर्षांच्या कमाल कालावधीसाठी 100 टक्के ऑन-रोड किमतीपर्यंतच्या कर्जावर 6.99 टक्के आकर्षक व्याजदरासह ऑफर केली जात आहे. 

महिंद्राने म्हटले आहे की, 'पहले आओ, पहले पाओ' या आधारावर बुकिंग स्वीकारले जाईल. निवडलेल्या व्हेरिएंटसोबत वाहनाच्या डिलिव्हरीची तारीख निश्चित केली जाईल. बुकिंग करण्यापूर्वी, ग्राहकांना कार्टमध्ये गाडी जोडणे आवश्यक आहे, जे महिंद्राच्या वेबसाइटवर जाऊन केले जाऊ शकते. वेबसाइटवरील बुकिंग पेजवर 'Add to Cart' ऑप्शन मिळेल.

दरम्यान, या किमती फक्त पहिल्या 25,000 बुकिंगसाठी आहेत. यानंतर कंपनी आपल्या किमती वाढवू शकते. हे दोन इंजिन पर्यायांमध्ये देण्यात आले आहे. याला 2.0-लिटर mStallion टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिनचा पर्याय मिळतो, जो 197 bhp आणि 380 Nm बनवतो तर दुसरा 2.2-लीटर mHawk डिझेल इंजिन पर्याय, जो 173 bhp आणि 400 Nm पर्यंत जनरेट करण्यास सक्षम आहे. ट्रान्समिशन पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, यात महिंद्राच्या 4 XPLOR 4WD सिस्टमसह 6-स्पीड MT आणि 6-स्पीड टॉर्क-कन्व्हर्टर AT आहे.

टॅग्स :Mahindraमहिंद्राAutomobile Industryवाहन उद्योग