महिंद्रा कंपनीची सर्वात जास्त विक्री होणाऱ्या कारपैकी एक असलेल्या स्कॉर्पियोचं नवं व्हर्जन लॉन्च होण्यासाठी सज्ज आहे. समोर आलेल्या माहितीनुसार स्कॉर्पियोचं नवं मॉडल अत्याधुनिक स्टाइल, अॅडव्हान्स फिचर्स, नवा लोगो आणि कूल कॅबिनसह जून महिन्यात लॉन्च होण्याची दाट शक्यता आहे. स्कॉर्पियो कारचा एसयूव्ही मार्केटमध्ये प्रचंड दबदबा आहे. त्यामुळे नव्या व्हर्जनमध्ये याबाबत तितकीच काळजी बाळगून काम करण्यात आलं आहे. महिंद्राची टीम नव्या स्कॉर्पियोला आणखी आक्रमक ढंगात बाजारात दाखल करणार आहे. यात क्रोम फिनिशमध्ये एक प्रॉमिनन्ट मल्टी-स्लेटेड ग्रिलचा समावेश आहे. अर्थात महिंद्राकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
नव्या स्कॉर्पियोचे स्पेसिफिकेशनसमोर आलेल्या माहितीनुसार नव्या स्कॉर्पियोमध्ये अपडेटेड बम्पर-माऊंडेट सी आकाराचे एलईडी डीआरएल पाहायला मिळतील. तर स्कॉर्पियोचं हे नवं व्हर्जन कंपनीच्या नव्या लोगोसह बाजारात दाखल होईल. कंपनीचा नवा लोगो याआधी XUV700 कारमध्ये वापरण्यात आला होता. याशिवाय स्कॉर्पियोच्या हेडलॅम्प आणि बंपरला देखील अपग्रेड करण्यात आले आहे. एसयूव्हीच्या धाकड लूकला आणखी आक्रमक रुप देण्यासाठी एक मोठी स्किड प्लेट कारला जोडण्यात आली आहे. महिंद्राच्या या नव्या एसयूव्हीमध्ये मल्टी-स्पोक अलॉय व्हील्स देण्यात येतील. यात २.० लीटर टर्बो पेट्रोल मोटर आणि २.२ लीटर डीझल युनिट दिलं जाण्याची शक्यता आहे. कारची पावर आणि टॉर्क आऊटपुट महिंद्राच्या थार कारसारखंच असू शकतं.
नव्या मॉडलची उत्सुकतानव्या स्कॉर्पियोमध्ये ग्राहकांना मोठा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सस्टम मिळणार आहे. तर वर्टिकल माऊंटेड एसी वेंट्स असतील. कंट्रोल सॉफ्ट टच बटण आणि रोटरी डायल असणार आहे. यातून एकंदर इंटेरियरला चांगला लूक येऊन जाईल. याशिवाय लेटेस्ट स्कॉर्पियोमध्ये वायरलेस Android Auto, Apple CarPlay आणि Alexa सपोर्ट मिळणार आहे. नव्या स्कॉर्पियोमध्ये एक सेमी-डिजिटल इन्स्ट्रूमेंट पॅनल दिलं जाईल. यात मध्यभागी एक मल्टी-इन्फो डिस्प्ले असेल. डिजिटल डिस्प्ले टायर प्रेशर, सीट बेल्ट रिमाइंडर, टेंपरेचर, रेंज, ट्रिप मीटर, एअरवेज स्पीड यासारख्या सुविधा उपलब्ध असतील.