महिंद्राने (Mahindra) आपली ऑफ रोड एसयूव्ही महिंद्रा थारचे (Off Road SUV Mahindra Thar) स्वस्त व्हेरिएंट महिंद्रा थार 2 व्हील ड्राइव्ह (Mahindra Thar 2 RWD) लाँच केले आहे. कंपनीने ही एसयूव्ही अनेक बदलांसह सादर केली आहे, यामध्ये नवीन कलर ऑप्शन, नवीन पॉवरट्रेन आणि फीचर्सचा समावेश आहे.
Mahindra Thar 2WD Priceकंपनीने महिंद्रा थार 2 व्हील ड्राइव्ह लाँच केली आहे. याची सुरूवातीची किंमत 9.99 लाख रुपये आहे, जी आपल्या टॉप व्हेरिएंटमध्ये 13.49 लाख रुपयांपर्यंत जाते. ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ही एसयूव्ही बुक करू शकतात. याशिवाय, जवळच्या डीलरशिपला भेट देऊन देखील ती बुक केली जाऊ शकते.
Mahindra Thar 2WD Color Optionमहिंद्रा थार 2 व्हील ड्राइव्ह कंपनीने दोन नवीन कलरमध्ये आणली आहे. ज्यामध्ये पहिला कलर ब्लेझिंग ब्रॉन्ज (Blazing Bronze) आणि दुसरा कलर एव्हरेस्ट व्हाईट (Everest White), हे दोन्ही कलर सध्याच्या थारमध्ये मिळत नाहीत.
Mahindra Thar 2WD Engine and Transmissionमहिंद्राने एंट्री लेव्हल थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिनचा ऑप्शन दिला आहे. पहिले इंजिन 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 152 hp आणि 320 Nm टॉर्क निर्माण करते. तर दुसरे इंजिन 1.5L डिझेल इंजिन आहे, जे 117hp पॉवर आणि 300Nm पीक टॉर्क जनरेट करते. या दोन्ही इंजिनसह 6 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ट्रान्समिशनचा ऑप्शन देण्यात आला आहे.
Mahindra Thar 2WD Featuresफीचर्सच्या बाबतीत यामध्ये Android Auto आणि Apple CarPlay कनेक्टिव्हिटी असलेला 7-इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्रूझर कंट्रोल, हॅलोजन लाइट्स, इलेक्ट्रिकल कंट्रोल्ड एसी, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि रिमुव्हेबल रूफ पॅनेलऐवजी हार्ड टॉप रूफ पॅनेल देण्यात आले आहे.
Mahindra Thar 2WD Safety Featuresमहिंद्रा थार 2 व्हील ड्राइव्हमध्ये, कंपनीने फ्रंटला ड्युअल एअरबॅग्ज, EBD सह अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, हिल डिसेंट कंट्रोल, रियर पार्किंग सेन्सर्स आणि फ्रंट सीट बेल्ट रिमाइंडर यांसारखी फीचर्स दिली आहेत.
Mahindra Thar 2WD Rivalsमहिंद्रा थारच्या स्वस्त व्हेरिएंटची थेट स्पर्धा लवकरच लाँच होणार्या मारुती जिमनी 5 डोअर आणि या सेगमेंटमधील सध्याच्या फोर्स गुरखा यासोबत होणार आहे.