Mahindra Atom EV: देशात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ आता वाढतच जात आहे. आता कंपन्यांसोबतच ग्राहक देखील इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रस दाखवत आहेत. दिग्गज कंपन्यांपासून अगदी स्टार्टअप कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहन बाजारात आणण्यावर लक्ष केंद्रीत करत आहेत. महिंद्रा इलेक्ट्रिकनं ट्रेओ ऑटो, ट्रेओ डिलिव्हरी व्हॅन, ट्रेओ टिपर व्हेरिअंट आणि ई-अल्फा मिनी टिपर देखील आणण्याची तयारी केली आहे. इलेक्ट्रीक थ्री-व्हिलर सेगमेंटमध्ये महिंद्राचा मार्केट शेअर ७३.४ टक्के इतका आहे. त्यामुळे कंपनी या सेगमेंटमध्ये अव्वल स्थानावर आहे.
४ व्हेरिअंटमध्ये लाँन्च होणार EVमहिंद्रा एटम चार व्हेरिअंटमध्ये म्हणजेच K1,K2,K3 आणि K4 अशा व्हेरिअंटमध्ये लॉन्च होणार आहे. यातील दोन व्हेरिअंट ७.४ किलोव्हॅट बॅटरी पॅकसह लॉन्च होणार आहेत. तर तर व्हेरिअंट दमदार ११.१ किलोव्हॅट बॅटरी पॅकसह बाजारात दाखल होतील. K1 आणि K3 च्या बेस व्हेरिअंटमध्ये एसीची सुविधा मिळणार नाही. तर K2 आणि K4 च्या व्हेरिअंटमध्ये एसीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार लवकरच भारतीय बाजारात एटम क्वाड्रिसायकल लॉन्च होणार आहे.
महिंद्रा एटम क्वाड्रिसायकलइलेक्ट्रिकवर चालणारी महिंद्रा एटम क्लीन एनर्जीसह आरामदायक आणि स्मार्ट फिचर्सनं सज्ज असणार आहे. यासोबत महिंद्रानं बाजारात इलेक्ट्रिक अल्फा टिपर देखील सादर केली आहे. जी ई-अल्फा मिनी प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. ई-अल्फा मिनी टीपरमध्ये १.५ किलोव्हॅट बॅटरी पॅक देण्यात आला आहे. यात सिंगल चार्जवर ८० किमीची रेंज मिळते. तर याची लोडिंग क्षमता ३१० किली इतकी आहे. सध्या महिंद्रा एटमला व्यावसायिक वाहनाच्या श्रेणीत लॉन्च करण्यात आलं आहे. यात आता वैयक्तिक वापरासाठी हे वाहन लॉन्च केलं जाणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
फक्त ३ लाख रुपये!महिंद्रा एटम फक्त लूक्स आणि फिचर्समध्ये तगडी नाही, तर किंमत देखील आकर्षक असणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार महिंद्रा एटमची किंमत ३ लाख रुपयांपासून सुरू होईल. यात EV चा सर्वाधिक स्पीड ५० किमी प्रतितास इतका असेल आणि संपूर्ण चार्ज होण्यासाठी ५ तासांचा कालवधी लागणार आहे. एटम इलेक्ट्रिक क्वाड्रिसायकल सिंगल चार्जमध्ये १२० किमीची रेंज देईल असा दावा कंपनीनं केला आहे. इलेक्ट्रिक ऑटो रिक्षासाठी हा उत्तम पर्याय ठरेल असं मानलं जात आहे.