नवी दिल्ली : महिंद्रा अँड महिंद्रा 29 एप्रिल रोजी नवीन SUV XUV 3XO ची लाँच करणार आहे. कंपनीने या नवीन कारबद्दल काही माहिती दिली आहे. नुकत्याच झालेल्या अपडेटमध्ये एसयूव्हीचे इंटिरियर फीचर्स आणि त्याच्या परफॉर्मन्सबद्दल माहिती देण्यात आली आहे. महिंद्रा XUV 3XO च्या नवीन टीझरनुसार, ही एसयूव्ही 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्ससह येईल. तसेच, या नवीन एसयूव्हीचे मायलेज 20.1 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत जाईल, असा दावा केला जात आहे.
नवीन महिंद्रा एसयूव्हीमध्ये तीन इंजिन ऑप्शन असतील. यापैकी एक 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल, जे 110PS पॉवर जनरेट करेल. दुसरे 1.2 लीटर TGDi टर्बो पेट्रोल इंजिन असेल, जे 117PS पॉवर जनरेट करेल. तिसरा ऑप्शन 1.5 लिटर डिझेल इंजिन असेल. या इंजिनसोबत 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा ऑप्शन दिला जाणार आहे. दरम्यान, महिंद्रा XUV 3XO चे अधिकृत टीझरवरून असे समजते की, कार फक्त 4.5 सेकंदात 0 ते 60 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते. यात ड्रायव्हिंगसाठी झिप, झॅप आणि झूम असे 3 मोड असतील.
इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर या महिंद्राच्या कारमध्ये दोन 10.25 इंच स्क्रीन असतील. यातील एक इन्फोटेनमेंट सिस्टिमसाठी असेल आणि दुसरा ड्रायव्हर डिस्प्लेसाठी असेल. कारचे क्लायमेट कंट्रोल पॅनल देखील सध्याच्या कारमधून अपडेटेड असणार आहे. कारमध्ये 3-स्पोक स्टीयरिंग व्हील, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, हरमन कार्डनची 7-स्पीकर साउंड सिस्टीम यांसारखी फीचर्स देखील असतील.
महिंद्रा XUV 3XO ही आपल्या सेगमेंटमधील पहिली कार असेल, जी पॅनोरॅमिक सनरूफसह येईल. यात स्टार्ट/स्टॉप पुश बटण, क्रूझ कंट्रोल, ड्युअल झोन एअर कंडिशनर आणि मागील बाजूस एसी व्हेंट, हवेशीर फ्रंट सीट्स आणि वायरलेस फोन चार्जिंग यांसारख्या फीचर्ससह बाजारात आणली जाऊ शकते. सेफ्टी साठी या कारमध्ये EBD सोबत अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, 6 एअरबैग आणि इलेक्ट्रिक स्टेबिलिटी कंट्रोल जसे फीचर्स देण्याची शक्यता आहे. याशिवाय, कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा आणि एडवांस ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम (ADAS) सारखे फीचर्स देखील मिळू शकतात.