शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
2
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
3
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
4
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
5
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
6
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
7
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
8
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
9
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
10
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
11
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
12
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
15
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
16
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
17
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
18
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
19
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
20
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले

Mahindra XUV400 : 6 सप्टेंबरला XUV400 इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच होणार, Tata चे टेन्शन वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 1:07 PM

Mahindra XUV400 : कंपनी पुढील महिन्यात XUV300 SUV चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणणार आहे. ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, या कारला XUV400 असे नाव देण्यात आले आहे, जी 6 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येईल.

नवी दिल्ली : या वर्षी 15 ऑगस्टला महिंद्राने धमाकेदारपणे आपल्या पाच इलेक्ट्रिक SUV आणल्या आहेत. या कार भारतीय बाजारात लाँच केल्या जाणार आहेत. पाच नवीन इलेक्ट्रिक SUV मध्ये XUV.e8, XUV.e9, BE.05, BE.07 आणि BE.09 यांचा समावेश आहे, जे महिंद्राच्या नवीन हार्टकोअर डिझाइन फिलॉसफीसह येतील. यामधील पहिल्या चार इलेक्ट्रिक कार पुढील चार वर्षांत 2024 ते 2026 दरम्यान लाँच केली जातील. याशिवाय, कंपनी पुढील महिन्यात XUV300 SUV चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणणार आहे. ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, या कारला XUV400 असे नाव देण्यात आले आहे, जी 6 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात येईल.

गेल्या महिन्यात या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे काही फोटो लीक झाले होते. या कारचे डिझाईन 2020 ऑटो एक्स्पोमध्ये दाखवलेल्या eXUV300 कॉन्सेप्टसारखी आहे. मात्र, ही इलेक्ट्रिक कार पेट्रोल-डिझेल XUV300 पेक्षा थोडी लांब (जवळपास 4.2 मीटर) असेल. कारण इलेक्ट्रिक वाहनांना उप-4 मीटर कर नियम लागू होत नाही. लांबीव्यतिरिक्त, डीआरएलसह नवीन हेडलाइट्स, टेल-लॅम्पसाठी नवीन डिझाइन आणि रीप्रोफाइल केलेले टेलगेट यासारखे एलिमेंट याला फ्यूल XUV300 पासून वेगळे करतात.

मिळू शकतात ADAS फीचरया इलेक्ट्रिक कारच्या मोटर किंवा बॅटरीबद्दल सध्या फारशी माहिती नाही. कंपनी याला सिंगल फ्रंट-व्हील-ड्राइव्ह इलेक्ट्रिक मोटरसह आणू शकते, जी सुमारे 150hp पॉवर जनरेट करू शकते. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, कंपनी XUV400 ला ADAS फीचर्ससह सुसज्ज करू शकते. या कारची थेट स्पर्धा Tata Nexon EV शी होऊ शकते, जी सध्या देशात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे. 

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगMahindraमहिंद्राElectric Carइलेक्ट्रिक कार