ईलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारात आता दोन भारतीय कंपन्यांमध्येच जुंपणार आहे. टाटा आणि महिंद्राने एकमेकांना शह देण्यासाठी कंबर कसली आहे. टाटाने नेक्सॉन ईव्ही नव्या रुपात लाँच करतात, एका वर्षातच आऊटडेटेड झालेल्या महिंद्रा एक्सयुव्ही ४०० ला नव्या रुपात आणले आहे.
महिंद्राने आज लाँच केलेल्या ईव्ही कारला XUV400 Pro असे नाव दिले आहे. याची किंमत व्हेरिअंनुसार असून 15.49 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. EC Pro आणि EL Pro असे दोन व्हेरिअंट मिळणार असून बॅटरी कॅपॅसिटीनुसार रेंजही असणार आहे. जुन्यापेक्षा या कारमध्ये नवे काय असा जर विचार केला तर कंपनीने केबिन नव्याने डिझाईन केली आहे. डॅशबोर्डसोबत नवा ब्लॅक ग्रे ट्रीटमेंट देण्यात आली आहे.
टॉप-स्पेक EL Pro प्रकारात 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, ऑल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जर, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, अपडेटेड एअरकॉन पॅनल, मागील सीटसाठी टाइप-सी यूएसबी पोर्ट, नवीन फ्लॅट-बॉटम स्टिअरिंग व्हील आणि अॅड्रेनोएक्स कनेक्टेड कार तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
XUV400 pro मध्ये दोन बॅटरी पॅक पर्याय आहेत. एक 34.5kWh आणि 39.4kWh युनिट आहे. पहिला बॅटरी पॅक 375 किमीची ड्रायव्हिंग रेंज ऑफर करण्याचा दावा करतो. तर, दुसरी बॅटरी एका चार्जवर 456 किमीची ड्रायव्हिंग रेंज ऑफर करते. ही एआरएआय रेंज आहे. यामुळे प्रत्यक्षात २५ ते ३० टक्के आणि ड्रायव्हिंग कंडीशनवरून कमी रेंज मिळते.