नवी दिल्ली-
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची XUV 700 या अत्याधुनिक एसयूव्ही कारची बाजारात सध्या चलती आहे. परवडणाऱ्या किमतीत अॅडव्हान्स फिचर्स उपलब्ध करुन देणारी कार म्हणून एक्सयूव्ही ७०० कडे पाहिलं जातं. भारतीय बाजारपेठेत लेव्हल-२ ADAS वैशिष्ट्य उपलब्ध असलेल्या कारपैकी महिंद्रा XUV700 एक लोकप्रिय कार आहे. तसंच कारमध्ये देण्यात आलेल्या सेफ्टी फिचर्सनंही अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
एक्सयूव्ही-७०० मध्ये देण्यात आलेल्या ADAS फिचरची खूपच चर्चा सध्या आहेत. एक्स्प्रेस हायवेवर कार चालक ऑटो मोड अॅक्टीव्ह करुन आराम करून शकतो आणि कार अतिशय स्मार्ट पद्धतीनं गाडीच्या वेगाचं व्यवस्थापन करते. याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसंच Mahindra XUV 700 च्या या फिचरचं कौतुक देखील केलं आहे. तर काहींनी सेफ्टीबाबत प्रश्न देखील उपस्थित केले आहेत.
व्हायरल व्हिडिओमध्ये Mahindra XUV 700 कार चालवणारा चालक एका हायवेवर कार ऑटो मोडमध्ये टाकून चक्क मित्रांसोबत पत्ते खेळत असल्याचं दिसून येतं. Mahindra XUV 700 मध्ये लेव्हल-२ ऑटोनॉमस फिचर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. यामाध्यमातून कार चालक एकाच लेनमध्ये राहण्यासाठी आणि कारचा वेग परिस्थितीनुसार नियंत्रित करण्यासाठी सूचना कारला देऊ शकतो. यात कार चालकाला स्टेअरिंग व्हिल धरुन बसावं लागत नाही. कार स्वत: परिस्थितीनुसार वेगाचं व्यवस्थापन करुन ऑटो मोडवर चालते.
महिंद्रा XUV 700 च्या याच फिचरचा वापर करत प्रवासात कसा आराम करता येतो हे दाखवून देण्यासाठी काही मित्रांनी एक व्हिडिओ शूट केला आहे. यात कारचा चालक ऑटो मोडवर कार ठेवून चक्क मित्रांसोबत चालत्या कारमध्ये पत्ते खेळण्याचा आनंद लुटत आहे.
Mahindra XUV 700 कारला मोठी मागणीमहिंद्रा XUV 700 कारला भारतीय बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. त्यामुळे खरेदीदारांना कार बुकिंगनंतर चक्क वर्षभर वाट पाहावी लागत आहे. तसंच कारचे रिव्ह्यू देखील चांगले आहेत. ग्राहकांची चांगली पसंती या कारला मिळत आहे.
XUV 700 कार २.२ लीटर mHawk डिझेल आणि 2.0 लीटर एमस्टॅलियन पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. कार ०-६० पर्यंतचा वेग अवघ्या ५ सेकंदात गाठू शकते. महिंद्रा XUV 700 मध्ये एकूण तीन ड्रायव्हिंग मोड देण्यात आले आहेत.