महिन्द्राची केयूव्ही १०० ही एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही आता पेसलिफ्ट करण्यात आली असून अधिक आगळ्या ढंगात ती सादर करण्यात आली आहे. लांबच्या प्रवासालाही एक चांगली कॉम्पॅक्ट एसयूव्ही म्हणून ती आरामदायी व आकर्षक ठरावी. नव्या केयूव्हीची लांब २५ मिमिने वाढवल्याने ती आता ३७०० मिमि इतकी झाली आहे. ऑटोगीयरही या कारला देण्यात आले आहेत. तर पुढे मागे फॉक्स स्कीड प्लेट्स देण्यात आल्या असून ग्रीलही अधिक आगळे केले आहे. डिझाईनच्या दृष्टीने केलेले हे बदल नव्या पिढीला पुन्हा आकर्षक वाटावेत, असे करण्यात आले आहेत. तळाला काळ्या रंगाचे क्लॅडिंग देण्यात आले असून हेडलॅम्पला नवा आकार व टेल लॅम्पला क्लीअर लेन्स देण्यात आले आहेचय रुफरेल्स, टेलगेट स्पॉयलर ही च्याची आणखी वेगळी वैशिष्ट्ये वरच्या श्रेणीमध्ये मिळू शकतात. १५ इंच डायमंड कट अलॉयव्हील्स हे केयूव्ही १०० एनएक्सटीचे आणखी वेगळे वैशिष्ट्य ठरावे. २०१६ मध्ये प्रथम बाजारात आलेल्या या केयूव्हीला आता फेसलिफ्ट करून डिझाईन मूळ जरी तेच असले तरी अन्य आकर्षक बदल मात्र करण्यात आले आहेत.
पाच व सहा आसनांमध्ये ती उपलब्ध केली असून अंतर्गत रंगसंगतीतीही काही ऑफर देण्यात आल्या आहेत. यामध्ये ग्रे व सर्व ब्लॅक अशा रंगांमध्ये ही अतर्गत सजावटीमधील वैशिष्ट्ये नव्याने दिली आहेत.
या शिवाय ७ इंचाचा टचस्क्रीन असलेली इन्फोटेनमेंट सिस्टिम असून यात जीपीएस नेव्हिगेशन देण्यात आले आहे. तसेच रिमोट लॉक व अनलॉक पद्धत, टेलगेटला लॉक, पॉवर फोल्डिंग विंग मिरर्स रेअर पार्किंग सेन्सर्स, मल्टिइन्फो डिस्प्ले असून त्यामध्ये तुमच्या गीअर बदलण्याची माहिती, ड्राइव्ह मोड्स कोणता वापरत आहात त्याची माहिती दिसू शकते.
ठळक वैशिष्ट्ये
- १.२ लीटर पेट्रोल इंजिन ८३ एचपी
- १.२ लीटर डिझेल इंजिन ७८ एचपी.
- पाच गीयर मॅन्युएल
- ऑटोगीयरही उपलब्ध
- फ्रंट व रेअर बम्परना नवा लूक
- डायमंड कट अलॉय व्हील्स
- ड्युएल चेंबर हेडलॅम्प व एलईडी डीआरेलसह
- डबल बॅरल क्लीअर लेन्स टेल लॅम्प
- नवी टेल गेट
- बाजूला असणारे फोल्डेबल आरसे
- पहिल्यापेक्षा थोडी लांब