देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असलेल्या महिंद्रा अँड महिंद्राने एक नवी खेळी खेळली आहे. कंपनीने बोलेरो मॅक्स पिक-अपची सिटी आणि एचडी रेंज व्हेरिअंट लॉन्च केले आहे. कार्गो सेगमेंटमध्ये ही एक मोठी खेळी असू शकते. कंपनीने ही कार्गो, डिझेल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरिअंटमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने या कमर्शिअल वाहनाची सुरुवातीची किंमत 7.85 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. याशिवाय, बोलेरो मॅक्स पिक-अपचे एचडी व्हेरिएंट 9.26 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आले आहे.
Mahindra Bolero Maxx Pik-Up चे फीचर्स -कंपनीच्या वेबसाइटनुसार, या नव्या बोलेरो मॅक्स पिकअपला लेटेस्ट टेक्नोलॉजी देण्यात आली आहे. आपल्याला या कारमध्ये, व्हेइकल ट्रॅकिंग, रूट प्लॅनिंग, जिओ फेंसिंग आणि व्हेइकल हेल्थ मॉनिटरिंग सारखे फीचर्स मिळतील.
Mahindra Bolero Maxx Pik-Up चे ड्रायव्हिंग फीचर्स -- 5.5 मीटरचे शॉर्ट टर्निंग रेडियस- शहरातील ट्रॅफिकसाठी पिकअप चांगला- पार्किंगसाठी कॉम्पॅक्ट डिझाइन- कोणत्याही त्रासाशिवाय उड्डाणपुलावर चढू शकते
कार्गो बॉक्स -मॅक्स पिकअल 17.2 किलोमीटर प्रति लिटर एवढे मायलेज देते. पिकअपची कार्गो साइज 1700 एमएम वाइड आणि 2500 एमएम लॉन्ग आहे. याशिवाय, ही कार्गो 1300 किलो मिटर पर्यंतचा भार वाहून नेऊ शकते. या पिकअपमध्ये ड्रायव्हर्सना अनेक प्रकारचे आरामदायक फीचर्स मिळतात. यात अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट्स मिळतील. सर्टिफाइड थ्री-सीटर केबिन आणि अधिक युटिलिटी स्पेससह मोठा डॅशबोर्ड देण्यात आला आहे. तसेच अधिक लेगरूमसह मोठी केबीनही देण्यात आली आहे.
इंजिन -कंपनीने या पिकअपला पॉवरफुल m2Di इंजिन देण्यात आले आहे. जे 195 NM एवढा टॉर्क जनरेट करते. तसेच या पिकअपला 185 एमएमचा अधिकचा ग्राउंड क्लिअरन्सदेखील देण्यात आला आहे. याशिवाय या पिकअपला अॅट्रॅटेक्टिव्ह LED टेल लॅम्प्ससुद्धा देण्यात आला आहे.